शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

करूळ घाटात आरामबस उलटून 15 प्रवासी जखमी, बसखाली अडकलेल्या दोन महिलांना वाचविण्यात पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 05:19 IST

गोव्याहून नाशिकला जाणारी खासगी आरामबस करूळ घाटात रात्री उशिरा उलटली. या दुर्घटनेत सुमारे 15 प्रवासी जखमी असून 3 ते 4 जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

- प्रकाश काळे वैभववाडी(सिंधुदुर्ग): गोव्याहून नाशिकला जाणारी खासगी आरामबस करूळ घाटात रात्री उशिरा उलटली. या दुर्घटनेत सुमारे 15 प्रवासी जखमी असून 3 ते 4 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. बसखाली अडकलेल्या दोन महिला प्रवाशांना दोन तासांनी बाहेर काढण्यात पोलीसांना यश आले आहे. जखमींना कोल्हापूरच्या 'सीपीआर' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आठवड्यात तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा तिसरा भीषण अपघात आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार करूळ येथील पोलीस तपासणी नाक्यापासून घाटात सुमारे दीड किलोमीटरवर गोव्याहून नाशिकला निघालेली 'साईरुचा' ही खासगी आरामबस (एमएच-15-एफव्ही- 9595) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. बहुतांश प्रवासी बसमधून कसेबसे बाहेर निघाले, मात्र दोन महिला प्रवासी बसखाली अडकल्या होत्या.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बसखाली अडकलेल्या महिलांना काढण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरून पोलिसांनी अखेर दोन तासांनी त्यांची सुटका केली. दरम्यान सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून कोल्हापूरच्या 'सीपीआर' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या बचावकार्यामुळे काही काळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु आरामबस रस्त्याच्या कडेला उलटल्याने करूळ घाटातील वाहतूक सुरळीत आहे.

पोलिसांच्या बचावकार्याला सॅल्युट !तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर आठवड्याभरात झालेल्या या तिस-या भीषण अपघातात जखमी अवस्थेत चालक अथवा प्रवासी अडकून पडले. आधीच्या दोन अपघातात अडकलेल्या जखमींसाठी देवदूत ठरलेले पोलीस नाईक राजेंद्र खेडकर तसेच पोलीस नाईक रवींद्र देवरुखकर यांनी अन्य सहका-यांच्या मदतीने आरामबसखाली अडकलेल्या दोन महिला प्रवाशांना वाचविले. त्यासाठी जेसीबी वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अंधारात हाताने खणून सुमारे दोन तासांनी बस खाली अडकून पडलेल्या दोन्ही महिलांना वाचविण्याची पुन्हा एकदा किमया करून दाखविली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बचावकार्याला 'सॅल्युट'च केला पाहिजे.

टॅग्स :Accidentअपघात