शाळांत १४० स्वच्छतागृह
By Admin | Updated: November 16, 2014 23:49 IST2014-11-16T21:53:55+5:302014-11-16T23:49:51+5:30
जिल्हा परिषद : १ कोटी ४० लाखांचे अनुदान मंजूरे

शाळांत १४० स्वच्छतागृह
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या १४० प्राथमिक शाळांसाठी स्वच्छतागृहे मंजूर करण्यात आली आहेत़ या स्वच्छतागृहांचे बांधकाम सर्वशिक्षा अभियानाच्या अनुदानातून करण्यात येणार आहे़
खासगी शैक्षणिक संस्था, नगर परिषद, जिल्हा परिषद आदिंच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे असणे अवश्यक आहेत़ त्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृहे देण्यात आली आहेत़
जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७०० प्राथमिक शाळा आहेत़ त्यामध्ये सुमारे १० हजार शिक्षक विद्यादानाचे काम करीत आहेत़ तर सुमारे दिड लाख विद्यार्थी शिकत आहेत़ जिल्ह्यात स्वच्छता अभियानांतर्गत शाळा, शासकीय कार्यालये, कुटुंबांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्यही करण्यात येत
आहे़
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची सोय करुन देण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून अनुदानाची उपलब्धता करुन देण्यात आली आहे़ जिल्ह्यातील १४० प्राथमिक शाळांसाठी सर्वशिक्षा अभियानातून स्वच्छतागृहांना मंजूरी देण्यात आली आहेत़
मंजूर करण्यात आलेल्या प्रत्येक स्वच्छतागृहासाठी एक लाख रुपयांचे अनुदान सर्वशिक्षा अभियानातून देण्यात येणार आहे़ त्यासाठी शिक्षण विभागाने पहिला हप्प्ता म्हणून प्रत्येक शाळेसाठी निम्मी रक्कम म्हणजेच ५० हजार रुपये शाळांकडे वर्ग करण्यात आली आहे. या स्वच्छतागृहांची बांधकामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या सर्व स्वच्छतागृहांसाठी १ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते़ यामधील ५० टक्के रक्कम शाळांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर उर्वरित रक्कम लवकरच शाळांना देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले़ (शहर वार्ताहर)
स्वच्छतेचा ध्यास
ं जिल्ह्यात स्वच्छतेचा ध्यास घेऊन निर्मल भारत अभियान जोरदार राबविण्यात आले. या अभियानामध्ये वैयक्तिक, सार्वजनिक, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या , शासकीय कार्यालये यांच्यामध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व शिक्षा अभियानातूनही स्वच्छतागृह नसलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधकामांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील एकही शाळा यापासून वंचित राहणार नाही.
सर्वशिक्षा अभियानातून १ कोटी ४० लाख रुपये मंजूर
५० टक्के रक्कम शाळांकडे वर्ग
शिक्षण विभागाचा सहभाग
स्वच्छतागृहांची बांधकामे लवकर सुरू होणार
प्रत्येकी १ लाखाचे अ़नुदान
तालुका मंजूर
शौचालये मंडणगड१४
दापोली२२
खेड ०४
चिपळूण४७
गुहागर०९
संगमेश्वर१३
रत्नागिरी१३
लांजा ९
राजापूर ९
एकूण१४०