शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत १३ लाखांची दारु जप्त ! पोलिसांची धडक कारवाई ; चालक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:06 IST

kankavli, liqerban, sindhdurgnews, police गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोमधून सुरू असलेली अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडली . तसेच संशयित आरोपी खालिक बग्गु खान ( वय ३७ रा.शिव , पी.बबेरु शक्ती , बांदा , उत्तरप्रदेश ) याच्या कडून तब्बल १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांची दारू जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे .

ठळक मुद्देकणकवलीत १३ लाखांची दारु जप्त !पोलिसांची धडक कारवाई ; चालक ताब्यात

कणकवली: गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोमधून सुरू असलेली अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडली . तसेच संशयित आरोपी खालिक बग्गु खान ( वय ३७ रा.शिव , पी.बबेरु शक्ती , बांदा , उत्तरप्रदेश ) याच्या कडून तब्बल १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांची दारू जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे .गोव्याहून मुंबईच्या दिशेने एका आयशर टेम्पो ( क्रमांक एम. एच. ४३- वाय. ८१६७ ) असा जात असून संबंधित टेम्पो हा गोवा बनावटीची दारु वाहतुक करीत आहे . अशी माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती.त्यामुळे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे पोलीस पथक तैनात करण्यात आले. समोरून येणाऱ्या आयशरला थांबण्याचा इशारा पोलीसांनी केला. परंतु , तो न थांबता कणकवलीच्या दिशेने वेगाने निघून गेला. त्यावेळी त्याचा पाठलाग करुन सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील नरडवे नाक्याच्या दरम्यान त्या टेम्पोला थांबवण्यात आले .टेम्पोच्या हौद्याच्या दरवाजाला कंपनीचे सिल असल्याने पंच घेऊन त्यांच्या समक्ष सिल न तोडता वरील नट खोलून टेम्पोची तपासणी करण्यात आली . यावेळी आतमध्ये अवैध गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. त्यात १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांची दारू होती.या दारूसह वाहतूकीसाठी वापरण्यात आलेला १० लाख रुपये किंमतीचा आयशर असा एकूण २२ लाख ९७ हजार ५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . तसेच टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे .या प्रकरणी पोलीस नाईक रुपेश धोंडु गुरव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालक पसार !याप्रकरणात जप्त केलेल्या गोवा बनावटीच्या दारूचा मालक हा मूळ गुजरात येथील असून सध्या तो गोवा, पणजी येथे राहत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली . त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी हे पथकासह गोवा येथे रवाना झाले. मात्र संशयित आरोपी हा तेथून आधीच पसार झाल्याने आढळून आला नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग