शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत मच्छीमारी करणा-या 13 पर्ससीन नौका पकडल्या, विजयदुर्ग समुद्रात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 21:06 IST

देवगड : विजयदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात पाच ते सहा वावांमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात मासेमारी करताना देवगड, विजयदुर्ग पोलिसांनी तसेच सागरी पोलीस विभागाच्या पोलिस कर्मचा-यांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवून 13 पर्ससीन नौकांना पकडले.

देवगड : विजयदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात पाच ते सहा वावांमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात मासेमारी करताना देवगड, विजयदुर्ग पोलिसांनी तसेच सागरी पोलीस विभागाच्या पोलिस कर्मचा-यांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवून 13 पर्ससीन नौकांना पकडले. ही कारवाई रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास केली. प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छीमारी करताना 13 पर्सनेट नौकांना पोलिसांनी पकडण्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून पोलिसांनी 13 पर्सनेट नौकांपैकी 10 नौका व 12 नौकांवरील तांडेल यांना विजयदुर्ग बंदरात आणले असून तीन नौकांना रात्री उशिरापर्यंत आणण्याची कारवाई सुरू होती. पकडलेल्या नौकांवर 261 कर्मचारी होते.विजयदुर्ग किल्ल्यासमोर रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वावामध्ये प्रतिबंधीत जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करीत असलेल्या पर्ससीन नौका स्वाभिमानचे युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे व विजयदुर्ग येथील स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास आल्या.उत्तम बिर्जे आणि स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते यांनी ही बाब विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली व मच्छिमारी करणा-या पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी देवगड येथील सागरी पोलीस दलाचे पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळुंखे तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर शिवगण यांच्याशी संपर्क साधून पर्ससीन नौका पकडण्याची मोंहीम हाती घेतली.देवगड येथील स्पीड बोटींच्या सहाय्याने पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर शिवगण, पोलीस उपनिरिक्षक नेवसे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, कोयंडे, मनोज साळवी तसेच स्वाभिमानचे उत्तम बिर्जे व त्यांचे सहकारी यांच्यासमवेत पर्ससीन नौका मच्छिमारी करीत असलेल्या ठिकाणी कारवाई केली.यावेळी रत्नागिरी व मालवण येथील प्रत्येकी एक नौका व राजापूर नाटे येथील 11 नौका प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना आढळल्या. नौकांवर कित्येक टन मासळी असल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्यातील तीन नौका तेथेच अडकल्यामुळे उर्वरीत दहा नौकांना विजयदुर्ग बंदरात कारवाईसाठी आणण्यात आले. बंदरात येत असतानाच काही नौकांनी दंडात्मक कारवाई कमी होण्यासाठी नौकेवरील मासळी समुद्र्रात फेकली.विजयदुर्ग बंदरामध्ये आणण्यात आलेल्या 12 नौकांमध्ये नौका महम्मद कासीफ अब्दुल्ला (नौकामालक जुबेर पंगेरकर, नाटे) कर्मचारी 18, अब्दुल हमीद (नौकामालक सिकंदर अब्दुल हमीद गोवलकर, नाटे) कर्मचारी 17, के.अब्दुल्ला(नौकामालक हनिफ कोतवडकर, नाटे) कर्मचारी 22, अल हसन(नौकामालक आदिल म्हसकर, नाटे) कर्मचारी 20, अल साकिब(नौकामालक दानीश हुना, नाटे) कर्मचारी 25, अल इब्राहीम(नौकामालक जहूर बोरकर, नाटे) कर्मचारी 25, एच अब्बास(नौकामालक मूनाब होडेकर, रत्नागिरी) कर्मचारी 26, महम्मद सैफ(नौकामालक सैजाद कोतडकर, नाटे) कर्मचारी 17, हिमालिया (नौकामालक हाजीमिया हुन्ना, नाटे) कर्मचारी 22 जुनेद फैजान (नौकामालक इश्राफ भाटकर, नाटे) कर्मचारी 25, मोरयाराज (नौकामालक संतोष काशीनाथ चव्हाण, नाटे) कर्मचारी 26 व विक्रांत (नौकामालक गोपीनाथ भगवान तांडेल, मालवण) कर्मचारी 19 या नौकांचा समावेश आहे. यातील तीन नौका काही कारणास्तव मच्छिमारी करीत असलेल्या ठिकाणीच अडकल्यामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत विजयदुर्ग बंदरामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू होती.विजयदुर्ग येथे प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना निदर्शनास आलेल्या नौकांबाबतची माहिती स्वाभिामन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी आमदार नितेश राणे यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून त्या नौकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.जिल्ह्यातील मोठी मोहीमविजयदुर्ग समुद्रात किल्ल्यासमोर पाच ते सहा वावामध्ये अनधिकृतपणे पर्ससीन नौका मच्छिमारी करीत असून रविवारी मच्छिमारी करताना नाटे येथील 11, रत्नागिरी येथील 1 व मालवण येथील 1 अशा एकूण 13 नौकांना पोलीस यंत्रणेमार्फत पकडण्याची कारवाई केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एवढी मोठी कारवाई केली आहे. संबंधित नौकांवर मोठ्या प्रमाणात मासळी असून नौका पुढील कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देवून त्यानंतर मासळीच्या लिलावाची प्रक्रिया होणार आहे. विजयदुर्ग समुद्रात अनधिकृत मासेमारी करताना देवगड, विजयदुर्ग पोलिसांनी तसेच सागरी पोलीस विभागाच्या पोलीस कर्मचा-यांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवून 13 पर्ससीन नौका पकडल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार