शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

गुप्तधनासाठी खड्डा खोदणा-या 11 जणांना अटक

By admin | Published: January 14, 2017 10:03 PM

जग २१व्या शतकाकडे झेपावत असताना समाजातील अंधश्रध्दा अजूनही मिटलेल्या नाहीत. दाभोळ येथे बंद घरात गुप्तधन पुरलेले आहे.

ऑनलाइन लोकमत
दाभोळ, दि. 14 - जग २१व्या शतकाकडे झेपावत असताना समाजातील अंधश्रध्दा अजूनही मिटलेल्या नाहीत. दाभोळ येथे बंद घरात गुप्तधन पुरलेले आहे, अशा समजुतीने घरात खड्डा खोदणाºया अकराजणांविरुध्द दाभोळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली. 
 
दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे हे सहकाºयांसह पेट्रोलिंग करत असताना पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास दाभोळ वरचा विभाग येथे गणपती मंदिराच्या पुढील बाजूस नेहमी बंद असलेल्या घरात लाईट दिसला. त्या घरात खोदकामाचा आवाज येत असल्याने तायडे यांनी गाडी थांबवून घराचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडल्यानंतर पोलीस आत गेले असता त्यांना माजघरात एक मोठा खड्डा खणलेला दिसला. खड्ड्याच्या एका बाजूला माती पडलेली दिसली तर जवळच एकजण मंत्र उच्चारत होता. 
 
बाजूला हळद पिंजरीने रेषा आखलेल्या व खड्ड्यामध्ये नारळ, लिंबू असे साहित्य दिसून आले. या घरात आठ ते नऊ अज्ञात लोक व एक अनोळखी महिला दिसली. हे सारेजण पोलिसांना बघून लपण्याचा प्रयत्न करू लागल्याने घराच्या मालकाबाबत पोलिसांनी विचारणा केली. त्यांच्यापैकी दार उघडणाºयाने आपले नाव सांगून हे घर सध्या आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना आणखीन संशय आला. त्यांनी या साºयांची कसून चौकशी केली. 
 
आपली परिस्थिती खूपच नाजूक असून ती सुधारण्यासाठी भगताने सांगितल्यानुसार आपण गुप्तधन काढण्याच्या हेतूने हा विधी करत असल्याचे त्याने सांगितले. यापैकी दुसºयाने मंत्र म्हणणारा माणूस हा गुप्तधन काढून देण्याकरिता जादूटोणा करतो, असे सांगितले. या मांत्रिकाने दि. १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता मुंबई येथून दोन वाहने भरून माणसे खड्डा खोदण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. 
 
पोलिसांनी तत्काळ पोलीस पाटील विनायक कुडाळकर यांना बोलावून घेतले. पोलिसांनी त्यांना सूचना करून घटनास्थळावर सापडलेले साहित्य हे त्याचठिकाणी ठेवून देण्यास सांगितले. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक तायडे यांनी स्वत: फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकरा जणांविरूद महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारा कायदा सन २०१३चे कलम ३(१) प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 
१७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
 
या सर्व ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.