१0५ जणांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: December 14, 2015 00:16 IST2015-12-13T22:52:30+5:302015-12-14T00:16:46+5:30
जिल्ह्यात तपासणी मोहीम : २९ वाहनचालकांवर कारवाई

१0५ जणांवर गुन्हे दाखल
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वाहतूक शाखेमार्फत १ ते १२ डिसेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणीत महाराष्ट्र मोटार कायद्यानुसार अवैध वाहतूक, दारू पिऊन वाहन चालविणे, कागदपत्रे नसलेल्या वाहनांची तपासणी केली. यावेळी २९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, तर १०५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली.जिल्हा वाहतूक शाखेमार्फत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम झाली. या मोहिमेसाठी वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यांचे कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र मोटार कायद्यानुसार वाहनांचा इन्शुरन्स नसेल, परवाना नसेल, ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली.यात २९ वाहनचालकांवर कागदपत्रे नसल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ८० वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याच दरम्यान ब्रेथ अल्कोहोल अॅनालायझर मशीनने वाहनचालकांची तपासणी केली. २५ वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
२४ हजार रुपये दंड वसूल
जिल्हा वाहतूक शाखेने राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अवैध वाहतूक परवाना नसणे, कागदपत्रे नसणे, आदी प्रकारच्या २९ वाहनालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून २४ हजार २०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.
हुंबरठ नाक्यामुळे मद्यपी चालकांना चाप
जिल्ह्यातील जनतेला सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी कणकवली येथील हुंबरठ तिठ्यावर तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या नाक्यावर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांना चाप बसला आहे. परिणामी प्रवाशांची सुरक्षित वाहतूक होत असल्याचेही वाहतूक पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी सांगितले.