शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: फोंडाघाट तपासणी नाक्यावर दहा लाखांची रक्कम ताब्यात, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

By सुधीर राणे | Updated: March 19, 2024 16:20 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई 

कणकवली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर  एका चार चाकी गाडीत दहा लाखाची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्थिर सर्वेक्षण पथक (एस.एस.टी.) व पोलिसांनी आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली.दरम्यान, ही रक्कम बांधकाम व्यावसायातील असल्याचा दावा संबधित व्यावसायिकाने केला आहे. मात्र, याची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून, रक्कम बेहिशोबी असल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या एका चारचाकीची तपासणी फोंडाघाट तपासणी नाक्यावर मंगळवारी पोलिसांनी केली. त्यावेळी त्या गाडीमध्ये १० लाखाची रक्कम आढळून आली.  पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांनी पुढील कारवाईसाठी  एसएसटी विभागाचे प्रमुख यांच्या ताब्यात ती रक्कम दिली.  यावेळी एसएसटी विभागाचे अधिकारी विश्वास राणे, बाणे,  पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, पोलिस हवालदार मंगेश बावदाने, पोलिस शिपाई सचिन माने, किरण मेथे आदी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे. मात्र, ही एवढी मोठी रक्कम का आणण्यात आली ? ती कुठे घेऊन जाण्यात येत होती ? याची कसून तपासणी सुरू असून लवकरच त्याबाबतची  माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.आयकर विभागाच्या पथकालाही या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस