शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान प्राप्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:12 IST

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष ...

ठळक मुद्देमहामार्गालगत शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात केली लागवड वैभव नाईक यांची माहिती

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष लागवड करण्याची योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील १७० शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात ५२,६३१ वृक्ष लागवडीची कामे केली असून त्यासाठीचे १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे रोपवनपूर्व प्रथम वर्ष अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१९ मध्ये या झाडांची लागवड करण्यात आली होती. परंतु त्याचे अनुदान अद्याप पर्यंत मिळाले नव्हते. यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत तसेच आपण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा सूरु ठेवला होता. त्या पाठपुरवठ्याला यश आले असून शेतकऱ्यांनी लावलेल्या वृक्ष लागवडीचे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.कणकवली ते झाराप पर्यंत १७० शेतकऱ्यांनी शासनाच्या योजने अंतर्गत १ कि मी पर्यंतच्या आपल्या खाजगी क्षेत्रात ५२,६३१ वृक्षांची लागवड केली होती. त्यासाठी प्रथम वर्षासाठी १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे अनुदान देणे अनिवार्य होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागात वर्ग झाले नव्हते.

त्यामुळे संबधित लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधींकडे हे अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी मागणी करत होते. यामुळे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आपण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांचे १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले आहे. हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडून लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप केले जाईल . असेही आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्ग