शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : स्वप्नात शारीरिक संबंध ठेवण्याचे 'खास' अर्थ, वाचून पडाल विचारात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 17:03 IST

Dream Interpretation : एका कंपनीच्या सर्व्हेनुसार, साधारण ९७ टक्के लोकांनी त्यांच्या स्वप्नात कुणा ना कुणासोबत शारीरिक संबंध (Sex Dream) ठेवले आहेत.

Dream Interpretation : तुम्ही कधी असं स्वप्न पाहिलंय का? ज्यात तुम्ही कुणासोबत शारीरिक संबंध ठेवत आहात? साधारण ९७ टक्के लोक कधीना कधी अशी स्वप्ने बघतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, ही स्वप्ने (Sex Dream Meaning) एका खास गोष्टीकडे इशारा करतात. झोपेत सगळेच स्वप्न बघतात. स्वप्नांमध्ये अनेक गोष्टी लपलेल्या असतात. अनेकदा भूतकाळ समोर येतो, तर अनेकदा अशा व्यक्तीसोबत भेट होते ज्यांना तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करत असता. किंवा त्या व्यक्तीशी भेट होते ज्याने तुम्ही फार प्रभावित असता.

एका कंपनीच्या सर्व्हेनुसार, साधारण ९७ टक्के लोकांनी त्यांच्या स्वप्नात कुणाना कुणासोबत शारीरिक संबंध (Sex Dream) ठेवले आहेत. डेलीमेलच्या वृत्तानुसार, सेक्सपर्ट ट्रेसी कॉक्स (Tracey-Cox) सांगतात की, या स्वप्नांचे खास अर्थ असतात. पण लोक यातून मिळत असलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. काही स्वप्ने आम्ही इथे डी-कोड करून सांगणार आहोत.

काय आहे अर्थ?

स्वप्नात एखाद्या अशा व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवणं ज्याच्याकडे तुम्ही खऱ्या आयुष्यात कधीच आकर्षित झाले नाहीत : असं स्वप्न याकडे इशारा करत आहे की, तुम्ही ज्या व्यक्तीच्या शोधात आहात. तो तुमचा शोध संपलेला नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या आयडिअल पार्टनरला शोध घेत आहात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शीघ्रपतन नेमकं कशामुळे होतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय...)

स्वप्नात ओळखीच्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणं

जर असं होत असेल तर याचा अर्थ हा होतो की, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत आनंदी नाहीत. आणि ज्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचं स्वप्न बघत आहात, त्याच प्रकारची व्यक्ती तुम्हाला हवी आहे. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण आहे. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूष लगेच का झोपतात? वाचा खरं कारण....)

एक्स बॉयफ्रेन्ड/गर्लफ्रेन्डसोबत शरीरसंबंधाचं स्वप्न बघणे 

ही फारच सामान्य बाब आहे की, लोक वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये एकसारखेच स्वप्न बघू शकतात. पण असं स्वप्न तुम्हाला इशारा देत आहे की, तुम्ही ज्या व्यक्तीपासून दूर झाले आहात, त्यांच्यापासून दूर जाण्याची तुमची इच्छा नव्हती. आणि अजूनही त्यांच्याविषयी तुमच्या मनात काहीतरी आहे. तुम्हाला अजूनही त्यांना खूपकाही सांगायचं आहे. 

स्वप्नात चेहरा न बघता एखाद्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे 

अशाप्रकारचं स्वप्न हे दुसरं सर्वात सामान्य स्वप्न असतं. त्यामुळे तुम्ही जास्त रोमॅंटिक होऊ नका. याचा अर्थ हा अजिबात नाही की, तुमची कुणीतरी वाट बघत आहेत. याचा सरळ अर्थ हा आहे की, तुम्हाला ज्याप्रकारचा पार्टनर हवा आहे त्याचा किंवा तिचा शोध अजून थांबलेला नाही. याचा अर्थ हाही होऊ शकतो की तुम्ही त्या खास क्षणांचा आनंद घेऊ शकत नाही आहात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर काय विचार करतात पुरूष? तुमच्यासोबतही 'असं' होतं का?)

नापसंत व्यक्तीसोबत शारीरिक संबंध

स्वप्नात तुम्ही तुमच्या एखाद्या नावडत्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत असाल तर याचा अर्थ होतो की, तुम्हाला त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची आहे. असं रागाची सीमा पार झाल्यानंतर होत असतं. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप