लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर काय विचार करतात पुरूष? तुमच्यासोबतही 'असं' होतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 04:35 PM2021-02-08T16:35:30+5:302021-02-08T16:42:45+5:30

शारीरिक संबंधानंतर(Sexual Health) पुरूष काय विचार करतात? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे खरं आहे की, शारीरिक संबंधानंतर पुरूष जास्त रिलॅक्स फील करतात. पण.....

Know what men think after sex and how do guys feel after sex | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर काय विचार करतात पुरूष? तुमच्यासोबतही 'असं' होतं का?

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर काय विचार करतात पुरूष? तुमच्यासोबतही 'असं' होतं का?

Next

पुरूष हे शारीरिक संबंधाबाबत बिनधास्त असतात. मात्र, महिला शारीरिक संबंधासारख्या विषयावर फार चर्चा करत नाहीत. भारतात हे प्रमाण अधिक बघायला मिळेल. शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर पुरूषांच्या वागण्यात अनेक बदल बघितले जाऊ शकतात. शारीरिक संबंधानंतर(Sexual Health) पुरूष काय विचार करतात? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे खरं आहे की, शारीरिक संबंधानंतर पुरूष जास्त रिलॅक्स फील करतात. त्यांच्या वागण्यातही मोठं अंतर बघायला मिळतं.

लगेच येते त्यांना झोप

जसे की, आम्ही तुम्हाला सांगितले की, जेव्हा पुरूष शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा त्यांना लगेच झोपायचं असतं. मात्र,  महिलांची इच्छा असते की, त्यांच्या पार्टनरने आप्टरप्ले करावा. मात्र, एका रिसर्चनुसार, पुरूष शारीरिक संबंध ठेवताना महिलांपेक्षा जास्त थकतात. शारीरिक संबंधावेळी पुरूषांच्या शरीरातून वीर्य बाहेर येण्यासोबत इतरही काही केमिकल्स बाहेर पडतात. ज्यामुळे पुरूषांना अधिक थकवा जाणवतो आणि त्यामुळे त्यांना झोप  येते. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : नव्या उत्साहासाठी 'ही' पद्धत ठरेल सर्वात खास...)

त्यासोबतच पुरूष जेव्हा शारीरिक संबंध ठेवतात आणि जेव्हा वीर्य(Sperm) रिलीज होतं तेव्हा शरीरात प्रोलॅक्टिन हार्मोनही (prolactin hormone) रिलीज होतात. ज्यामुळे त्यांना झोप येते. शारीरिक संबंधानंतर  पुरूषांच्या शरीरात लव्ह हार्मोन म्हणजे ऑक्सिोसिन (oxytocin hormone) रिलीज होतात. ज्यामुळेही पुरूषांना आपोआप झोप येते.

हैराण होतात पुरूष

एका रिसर्चनुसार शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरूष थकतात. मात्र, ही बाब प्रत्येक पुरूषासोबत होत नाही. पण एका रिसर्चनुसार, ४१ टक्के पुरूष शारीरिक संबंधानंतर दु:खी होतात. जी एक सामान्य बाब आहे. जास्तीत जास्त केसेसमध्ये महिलांसोबत असं जास्त होतं. मात्र, असं पुरूषांसोबतही होतं. शारीरिक संबंध ठेवण्याआधी पुरूष फार एक्सायटेड असतात. पण जेव्हा शारीरिक संबंधाची क्रिया संपते तेव्हा त्यांना चांगलं नाही तर वाईट वाटू लागतं. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!)

अनेक पुरूषांना वाटते भीती

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अनेक पुरूष असेही असतात ज्यांना भीती वाटते किंवा ते घाबरतात. याला डॉक्टर पोस्ट कोइटल डिस्फोरिया असं म्हणतात.  ही बाब प्रत्येक पुरूषांसोबत होत नाही. पण काही पुरूष असे असतात ज्यांना शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ते घाबरतात. जर तुमच्यासोबतही असंच काही होत असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण यावर आपोआप तर उपचार होणार नाही. 
 

Web Title: Know what men think after sex and how do guys feel after sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.