जेव्हा लोक रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांच्यात प्रेम, भावना व्यक्त करण्यासाठी फिजिकल इंटिमसी डेव्हलप होते. पण अनेक कपल्स शारीरिक संबंध या विषयावर चर्चा करण्याआधी चिंतेत असतात. त्यांना भीती असते की, त्यांचा पार्टनर त्यांची घाई किंवा शारीरिक संबंधाबाबतचा पुढाकार बघून जज तर करणार नाही ना? अशात हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे की, साधारण किती दिवस डेटिंग केल्यावर कपल्स शारीरिक संबंधाकडे वळतात?

एका ऑनलाइन मेडिकल कन्सल्टेशन सर्व्हिसने याच विषयावर एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये अमेरिका आणि यूरोपच्या लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते आणि सर्व्हेत सहभागी ५० टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी १ महिना वाट पाहिली. म्हणजे एक महिना डेट केल्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. तेच २१ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवायला ६ महिने वाट पाहिली.

वाट पाहण्याचा स्ट्रेस नात्यावर

सर्व्हेमध्ये सहभागी लोकांनी ही गोष्टही मान्य केली की, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्याआधी किती दिवस वाट बघावी आणि घाई केल्याने पार्टनरने जज करू नये, या गोष्टीच्या स्ट्रेसचा नेहमीच नात्यावर प्रभावही पडला. एक्सपर्ट्स सांगतात की, जर दोन व्यक्तींना शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर आणि ते वयस्क असतील तर ही गोष्ट दोघांच्या मर्जीने झाली पाहिजे.

शारीरिक संबंधाआधी मत जाणून घेणं गरजेचं

consent म्हणजेच परवानगी हा एक फार महत्त्वाचा शब्द आहे. जर दोन्ही पार्टनरपैकी एक आधी शारीरिक संबंधासाठी तयारी दर्शवतो. पण नंतर वेळेनुसार, सहजता नसल्याने किंवा इतर कोणत्या कारणाने नंतर संबंधाला नकार दिला तर त्या व्यक्तीला बळजबरी करू नये. सोबतच प्रेग्नेंसी आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीजपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कंडोमचा वापर नक्की करावा.

Web Title: Survey claims that 50 percent dating couple wait for a month before having sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.