एक्सरसाइजबाबत हे सर्वांनाच माहीत आहे की, एक्सरसाइज केल्याने शरीर फिट राहतं आणि मनही आनंदी राहतं. या व्यक्तिरिक्त एक्सरसाइजचे आणखी काही फायदे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. म्हणजे वर्कआउट करता करता शारीरिक संबंधाचा आनंद मिळेल तर एक्सरसाइज करणं कुणाला आवडणार नाही?
एक्सरसाइज ऑर्गॅज्म
काही रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, एक्सरसाइज ऑर्गॅज्म होत असतो. सेक्शुअल अॅन्ड रिलेशन थेरपीमध्ये सांगण्यात आलं आहे की, एक्सरसाइजवेळी ऑर्गॅज्म फील होणे ही एक सामान्य बाब आहे. या अभ्यासासाठी ५३० महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. यातील ४६ टक्के महिलांना एक्सरसाइज करताना ऑर्गॅज्मचा अनुभव आला.
प्रत्येकवेळी ऑर्गॅज्म
असं गरजेचं नाही की, तुम्हाला एक्सरसाइज दरम्यान प्रत्येक वेळी ऑर्गॅज्मचा अनुभव येईल. असं नेहमी होत नाही. असा अनुभव काही मोजक्याच एक्सरसाइजमध्ये येऊ शकतो. खासकरून पेल्विक आणि अब्डोमन रीजनशी संबंधित एक्सरसाइजने. यात सिट-अप, सायकलिंग किंवा पेल्विक रीजन(ओटी पोटाचा भाग)शी संबंधित कोणतीही एक्सरसाइज असू शकते.
किती वेळासाठी मिळतो हा आनंद
सेक्शुअल ऑर्गॅज्म हा ३ ते २० सेकंदाचा असतो. तेच एक्सरसाइज ऑर्गॅज्म केवळ काही सेकंदासाठीचा होतो. मात्र इतक्या वेळाचाच ऑर्गॅज्म तुमचा मूड फ्रेश करून जातो.
महिलांना येतो जास्त अनुभव
अभ्यासकांना अजूनही प्रश्न पडला आहे की, एक्सरसाइज करताना ऑर्गॅज्मचा अनुभव का होतो? एक्सपर्ट सांगतात की, असं पेल्विक रीजनच्या मसल्स आकुंचन पावल्यामुळे होऊ शकतं. पुरूषांच्या तुलनेत महिलांना या ऑर्गॅज्मचा अधिक अनुभव येतो.
पुरूषांचं इरेक्शन होईलच असं नाही
असं अजिबात नाही की, एक्सरासाइज दरम्यान पुरूषांना इरेक्शन होईलच. पण इजॅक्यूलेशनची शक्यता अधिक असते. जर यावेळी एखाद्या पुरूषाला इरेक्शन होतही असेल तर ते शारीरिक संबंधाच्या तुलनेत फार कमी असेल.