(Image Credit : scoopnest.com)
सिनेमा आणि मनोरंजनाच्या विश्वाने लोकांमध्ये शारीरिक संबंधाबाबत अनेक फॅंटसीज जागवल्या आहेत. अनेक भारतीय इंटरनेटचं जगणं खऱ्या आयुष्यात जगण्याच्या दबावामुळे तर काही लोक नाइलाजाने वायग्रा सारख्या औषधाचा वापर करू लागले आहेत. इंडिया टुडे सेक्स सर्व्हे २०१९ नुसार, लोक वायग्रा किंवा अशाप्रकारच्या औषधांबाबत डॉक्टरांकडून गपचूप सल्ला घेणं पसंत करतात.
इंडिया टुडेच्या या सर्व्हेतून समोर आले की, जयपूर आणि चंडीगढसारख्या शहरांमध्येही क्रमश: ८७ आणि ६२ टक्के लोक कामेच्छा वाढवण्यासाठी याप्रकारच्या औषधांचा वापर करतात. जयपूरमधील लोकांसाठी शारीरिक संबंध ही खाजगी बाब आहे. ज्याबाबत ते गरज असेल तर डॉक्टरांशी बोलतात.
सर्व्हेतील निष्कर्षात २८ टक्के लोकांनी ही बाब मान्य केली की, ते शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वायग्रासारख्या औषधांचा आधार घेतात. राजस्थानातील एसएमएस मेडिकल कॉलेज आणि संस्थेचे प्राचार्य डॉ.सुधीर भंडारी यांचं वायग्राच्या वापरा वापरावर वेगळं मत आहे.
सर्व्हेमधून असेही समोर आले आहे की, लोकांमध्ये शारीरिक संबंधाबाबत बोलण्यात संकोच असतो. पण आता आपल्या लैंगिक समस्यांबाबत लोक आधीच्या तुलनेत डॉक्टरांशी अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. डॉ. भंडारी सांगतात की, 'जयपूरच्या महिलांसहीत लोकांमध्ये लैंगिक समस्यांबाबत जागरूकता बघायला मिळाली. त्यांना या समस्यांवर उपायही शोधायचा आहे'.
डॉ. भंडारी सांगतात की, 'हे गरजेचं नाही की, लोकांनी केवळ फॅंटसीसाठी वायग्राचा वापर केला असेल. अनेक लोक सांगतात की, कशाप्रकारे डायबिटीसने त्यांचं लैंगिक जीवन विस्कळीत केलं आहे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्यावरच आम्ही त्यांना अशाप्रकारची औषधे देतो'.
त्यांनी पुढे सांगितले की, 'सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा पुरूषार्थाची कमतरता ही कोणत्याही व्यक्तीसाठी हार्टच्या समस्येचा पहिला संकेत असू शकतो. असंही होऊ शकतं की, ही औषधे घेणारे जास्तीत जास्त सहभागी लोक हे त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा औषधांचं सेवन करत असतील'.
२०१८ मधील एका रिपोर्टुनुसार, भारतात गेल्या ८ वर्षांमध्ये वायग्रासारख्या औषधांचा व्यवसाय हा ४० टक्क्यांनी वाढलाय. डॉक्टर्स मानतात की, वर्कप्लेसवर फार जास्त स्ट्रेस असल्याने सुद्धा लोकांची बेडरूम लाइफ खराब होत आहे. स्ट्रेसचा प्रभाव त्यांच्या रोमॅंटिक लाइफवर पडू नये म्हणूनही काही लोक हे औषध घेत असतील. मात्र, अशाप्रकारचं औषध घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्टनुसार, गेल्या ८ वर्षांमध्ये यासंबंधीत औषधे विकणारे ९ लाख केमिस्ट वाढले आहेत. जून २०१० मध्ये १८ हजार ड्रग यूनिट विकले गेले होते. तेच जून २०१८ मध्ये याचे २६ हजार ड्रग यूनिट विकले गेले होते.
२०१९ च्या इंडिया टुडेच्या सर्व्हेत लोकांना इतरही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ३३ टक्के लोकांनी हे मान्य केलं की, ते १८ व्या वयाच्या आधीच फिजिकल झाले होते. तसेच सर्व्हेतून असेही समोर आले की, भारतीय व्हर्जिनिटीबाबत अजूनही मागासलेले विचार करतात. ५३ टक्के लोक आपल्या पार्टनरच्या व्हर्जिनिटीला फार गंभीरतेने घेतात.