शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लैंगिक जीवन : हस्तमैथुन केल्याने खरंच डोळ्यांवर वाईट प्रभाव पडतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 4:42 PM

अनेकजण याला चुकीचं मानतात. पण तज्ज्ञ सांगतात की, यात चुकीचं काही  नसून ही एक नैसर्गिक क्रिया आहे. तसेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हे सर्वांनाच माहीत आहे की, हस्तमैथुनाबाबत कुणीही मोकळेपणाने बोलत नाहीत. वास्तविक पाहता जास्तीत जास्त लोक हस्तमैथुन करतात, पण यावर बोलायला लाजतात. तसेच याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमजही असतात. अनेकजण याला चुकीचं मानतात. पण तज्ज्ञ सांगतात की, यात चुकीचं काही  नसून ही एक नैसर्गिक क्रिया आहे. तसेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण प्रमाण अधिक असू नये.

हस्तमैथुनाबाबत लोकांमध्ये एक असा गैरसमज आहे की, हस्तमैथुन केल्याने शारीरिक कमजोरी येते आणि याचा डोळ्यांवरही वाइट परिणाम होतो. यावर तज्ज्ञ सांगतात की, हस्तमैथुनामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर प्रभाव पडू शकतो, पण याचा शरीराच्या कोणत्याही अवयवावर कोणताही वाईट प्रभाव पडत नाही.

आरोग्यासाठी किती नुकसानकारक हस्तमैथुन?

हस्तमैथुनाचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो हा केवळ एक गैरसमज आहे. हस्तमैथुनाने आंधळेपणा किंवा वेडसरपणा येत नाही. हे केल्याने ना डोळ्यांची दृष्टी जात. याने शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या विकासात अडथळा येत नाही.

याउलट हस्तमैथुन केल्याने तुमचा मानसिक तणाव कमी होतो आणि शरीरात आनंद देणारे हार्मोन्स इंडॉर्फिनचं प्रमाण वाढतं. याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते आणि सोबतच तुमचा प्रायव्हेट पार्ट अॅक्टिवही राहतो. याला तर तज्ज्ञ सुरक्षित सेक्सची सर्वात चांगली पद्धत मानली आहे.

गैरसमज

डॉ. मायकल एशवर्थ यांच्यानुसार, ते याबाबत लोकांकडून वेगवेगळे गैरसमज ऐकत असतात. ज्यात हैस्तमैथुनाने आंधळेपणा येणे, तळहातावर केस येणे किंवा एखादा मानसिक आजार होत असल्याचे गैरसमज ते ऐकत असतात.

महिलांसाठी सुरक्षित पद्धत

पुरूषांच्या तुलनेत एक तृतियांश महिलांना हस्तमैथुनाची सवय आढळून आली आहे. ज्यातील जास्तीत जास्त महिला त्यांच्या प्रायव्हेट पार्टसाठी एखादी वस्तू वापरतात. पण त्यांनी असं अजिबात करू नये. त्यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. कारण त्या वस्तूसोबत बॅक्टेरियाही प्रायव्हेटमध्ये शिरतात आणि याने इन्फेक्शन होऊ शकतं. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनHealth Tipsहेल्थ टिप्सRelationship Tipsरिलेशनशिप