शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : खरंच बाळाच्या जन्मानंतर सगळंच थांबतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 15:19 IST

लैंगिक जीवनाबाबत वेगवेगळे गैरसमज लग्न होण्याआधीपासून पसरलेले असतात. त्यातील एक सर्वात मोठा गैरसमज म्हणजे मुल झाल्यानंतर लैंगिक जीवन संपतं.

(Image Credit : thenewsyork.com)

लैंगिक जीवनाबाबत वेगवेगळे गैरसमज लग्न होण्याआधीपासून पसरलेले असतात. त्यातील एक सर्वात मोठा गैरसमज म्हणजे मुल झाल्यानंतर लैंगिक जीवन संपतं. भलेही मुल झाल्यावर वेगवेगळ्या समस्यांशी तुमचा सामना होत असेल. पण हे नक्की की मुल झाल्यावर लैंगिक जीवन थांबत नसतं. जगभरात होत असलेल्या अभ्यासानुसार, बाळाला जन्म दिल्यावर काही दिवसांनी किंवा महिलांमध्ये कामेच्छा स्वाभाविकपणे परत येते.

सामान्यपणे बाळाच्या जन्माच्या सहा आठवड्यानंतर डॉक्टर महिलांना शारीरिक संबंध कायम करण्याचा सल्ला देतात. पण काही महिलांना इतक्या कमी वेळेतही सहजता येत नाही. तज्ज्ञ सांगतात की, बाळाच्या जन्मानंतर काही महिलांमध्ये कामेच्छा परत येण्याला वर्षही लागू शकतं.  

तज्ज्ञांनुसार, सुरुवातीला शारीरिक संबंधासाठी वेळ काढणं थोडं कठीण असतं. त्यामुळे सुरुवातील केवळ एकमेकांना जवळ घेणे, किस करणं किंवा फोरप्ले पुरेसा ठरतो. याने कामेच्छा जागृत होण्यास मदत होते. 

बाळ झाल्यानंतर वजन वाढल्याने ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच चर्चेत आली होती. पण ऐश्वर्याने आपलं शरीर नैसर्गिकरित्या शेपमध्ये येऊ दिलं. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की, हे मान्य करा की, तुमचं शरीर बदललं आहे. याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. याउलट शरीर फिट नसण्याची चिंता लैंगिक इच्छा कमी करते. 

जर तुमची प्रसुती नॉर्मल झाली असेल आणि तुम्हाला फार जास्त त्रास झाला नसेल तरीही पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना वेदना होणं स्वाभाविक आहे. कारण महिलांचं गुप्तांग फार नाजूक असतं आणि यात नैसर्गिक कोरडेपणामुळे समस्या होऊ शकते. अशावेळी तज्ज्ञ सांगतात की, घर्षण होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकंटचा वापर करावा. पण जर वेदना असह्य होत असेल तर शरीर सामान्य होण्यासाठी थोडा वेळ घ्यावा. 

तज्ज्ञांनी सांगितले की, काही पुरुषांसाठी हे आणखी कठीण होतं, जेव्हा ते डिलेवरी होताना तिथे उपस्थित असतात. पत्नी आता एका बाळाची आई झाली आहे हे काही पुरुषांना उत्साहित करतं तर काहींना नाही. यामुळेही पती शारीरिक संबंधापासून दूर पळत असल्याची तुम्हाला भीती असेल तर त्यांना विश्वास द्या की, तुम्ही अजूनही आधीसारख्या एनर्जेटिक आहात. याने त्यांच्यातील कामेच्छा कायम राहिल. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सrelationshipरिलेशनशिप