शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीवाशी खेळू नका! लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या खाण्यापूर्वी सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 08:51 IST

अतिरिक्त सेवनाने दुष्परिणामांचा करावा लागतो सामना

संतोष आंधळेमुंबई : लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी विविध औषधे घेण्याकडे पुरुषांचा कल असतो. मात्र या औषधांचे सेवन मोठ्या प्रमाणात केल्याने अनेक पुरुषांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशाच गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे रविवारी नागपुरात एका युवकाचा मृत्यू झाला होता, तर उत्तर प्रदेशात याच कारणामुळे एका युवकाला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे अतिशय सहजपणे मिळणाऱ्या या कामोत्तेजक गोळ्या घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असून, विनासल्ला अशा गोळ्यांच्या सेवनाने गंभीर परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या युवकाला लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या औषधाचा अतिरेक करणे चांगलेच महागात पडले होते. त्यातून उद्भवलेल्या व्याधीच्या उपचाराचा भाग म्हणून डॉक्टरांना त्या रुग्णाच्या लिंगावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. या युवकाने मित्राच्या सल्ल्याने लैंगिक क्षमता वाढविण्याच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली आणि त्याचा अतिरेक झाल्याने त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दुसऱ्या एका घटनेत, रविवारी नागपूर येथे एका युवकाचा शारीरिक संबंध करतानाच मृत्यू झाला. संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी त्याने लैंगिक क्षमता वाढविण्याच्या गोळ्या घेतल्याचे त्याच्या प्रेयसीने पोलिसांना सांगितले.

या औषधांबाबत जसलोक रुग्णालयातील मूत्र शल्यचिकित्सक आणि लैंगिक तज्ज्ञ डॉ. संतोष गवळी यांनी सांगितले की, हे औषध सरसकट सर्वांसाठी नसून, ज्यांना लैंगिक समस्या भेडसावत असतील, त्यांनीच वैद्यकीय सल्ल्यानेच अशी औषधे घ्यावीत. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या वजन, उंची आणि व्याधीची तीव्रता यानुसार औषधांचा डोस ठरलेला असतो. या गोळ्यांमध्ये सिल्डेनाफिल औषध असून लिंगामधील रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी ते वापरले जाते. तथापि, या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्यास त्या व्यक्तीच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे शासनाने हे औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनेच मिळेल आणि सहजपणे उपलब्ध होणार नाही, अशी तरतूद करावी, असे मत डॉ. गवळी यांनी मांडले.

अतिरिक्त सेवनाने काय होतात त्रास?या गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनाने डोके आणि छातीत दुखणे, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे, चेहऱ्यावर सूज येणे, श्वसनासंबंधी समस्या उद्भविणे, डोळे लाल होणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच, या गोळ्यांच्या अतिसेवनाने प्रिंपीसम हा आजरा होतो.

अतिसेवनाने प्रिंपीसम आजारगेली ५२ वर्षे मी लैंगिक समस्या या विषयावर काम करत आहे. आजपर्यंत लैंगिक समस्या असलेले ५५,००० पेक्षा अधिक रुग्ण बघितले आहेत. त्यातील १५,००० पेक्षा अधिक व्यक्तींना लैंगिक समस्येच्या निवारणासाठी मी लोकांना लैंगिक क्षमता वाढण्यासाठीचे औषध लिहून दिले आहे. त्यांचा मी रीतसर पाठपुरावा घेत असतो. आजपर्यंत कुणाला फारसा त्रास झालेला नाही. काही छोटे दुष्परिणाम झाल्यास ते एक - दोन दिवसांत बरे होतात. परंतु, ज्या काही वाईट घटना घडल्या आहेत, त्यांच्यामागे लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या हेच कारण आहे का, याचा खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. या गोळ्यांच्या अतिसेवनाने प्रिंपीसम हा आजार होतो, मात्र त्यावरही उपचार आहेत, असे डॉ. प्रकाश कोठारी म्हणाले.