शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फेक ऑर्गॅज्म विरोधात अभिनेत्री पूजा बेदी मैदानात, जाणून घ्या काय आहे फेक ऑर्गॅज्म?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 16:48 IST

बॉलिवूडमध्ये आता पुन्हा एक नवीन कॅम्पेन सुरू होईल असं वाटतंय. यावेळी चर्चा रंगली आहे ती फेक ऑर्गॅज्मची.

बॉलिवूडमध्ये आता पुन्हा एक नवीन कॅम्पेन सुरू होईल असं वाटतंय. यावेळी चर्चा रंगली आहे ती फेक ऑर्गॅज्मची. अभिनेत्री पूजा बेदीने याबाबत पुढाकार घेतला असून या अभियानाशी याआधीच अभिनेत्री स्वरा भास्कर, सलोनी चोप्रा, अपारशक्ती खुराणा जोडल्या गेल्या होत्या. या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर  #IFakedItToo असं कॅम्पेन सुरू केलं आहे.

कंडोमच्या एका ब्रॅन्डनुसार, भारतात ७० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांना प्रत्येकवेळी शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही. आता या मुद्यावर पूजा बेदी या कंडोमच्या ब्रॅन्डसोबच जोडली गेली आहे. कंडोम ब्रॅन्डच्या ऑफिशिअल पेरवरून पूजाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती फेक ऑर्गॅज्मबाबत महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देणार असं सांगत आहे.  

काय आहे फेक ऑर्गॅज्म?

मुळात फेक ऑर्गॅज्म किंवा ऑर्गॅज्म काय असतं हे लोकांना माहीत आहे की नाही यावरच शंका आहे. त्यामुळे फेक ऑर्गॅज्म काय आहे हे समजून घेऊ. ऑर्गॅज्म म्हणजे शारीरिक संबंध ठेवताना मिळणारा परमोच्च आनंद. एका सर्व्हेत महिलांना विचारलं गेलं की, त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो का? यावर सर्व्हेत सहभागी सर्वच महिलांनी यावर नकारात्मक उत्तर दिलं होतं. अशात एक्सपर्ट सांगतात की, अनेकदा महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव येत नाही. अशावेळी जोडीदाराला संतुष्टी मिळवून देण्यासाठी महिला परमोच्च आनंद मिळाल्याचं नाटक करतात. यालाच फेक ऑर्गॅज्म म्हणतात.

यावर महिला सांगतात की, ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नसल्याने त्या तसं नाटक करू लागतात. जेणेकरून त्यांच्या पार्टनरला वाटू नये की, त्या शारीरिक संबंधासाठी उत्तेजित नाहीत. किंवा असाही गैरसमज होऊ नये की, त्यांना शारीरिक संबंध ठेवायचे नाही.

पुरूषांचं काय?

हा महिलांचा विषय पण फेक ऑर्गॅज्म केवळ महिलाच नाही तर पुरूष करतात. अमेरिकेच्या कॅन्सास यूनिव्हर्सिटीमध्ये २०११ मध्ये २०० पुरुषांवर एक सर्वे करण्यात आला. यातील 25 टक्के पुरुषांनी(50 टक्के महिलांच्या तुलनेत) मान्य केले की, ते शारीरिक संबंधादरम्यान परमोच्च आनंद मिळाल्याचं खोटं खोटं भासवतात. 

काय आहे असं करण्याचं कारण?

याचं कारण म्हणजे त्यांना जेव्हा असं वाटतं की, ते परमोच्च आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा पुरुष असं करतात. जेव्हा शारीरिक संबंधाला जास्त वेळ लागत असेल किंवा त्यांना हे क्रिया लवकर संपवायची असेल तेव्हाही ते परमोच्च आनंद मिळल्याचं खोटं खोटं भासवतात. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनPooja Bediपूजा बेदीRelationship Tipsरिलेशनशिप