शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर शस्त्राचे वार झेलत तरुणांनी रोखला ज्वेलर्सवरील दरोडा, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:22 IST

चोरट्यांना पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

सातारा : सातारा शहरात ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शस्त्रधारी आरोपींना दोन तरुणांनी पकडले. यावेळी आरोपींच्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. आरोपींनी धारदार शस्त्राने वार केले. मात्र, तरीसुद्धा तरुणांनी आरोपींना साेडले नाही. नागरिकांच्या मदतीने पकडून दोघा आरोपींना शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. ही धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे तीन वाजता प्रतापगंज पेठेत घडली.शुभम दीपक इंगवले (वय २२, रा. किडगाव, ता. सातारा) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रतापगंज पेठेत प्रवीण भोसले यांचे केदारनाथ ज्वेलर्स आहे. या दुकानाशेजारी ऋषिकेश तिताडे (वय २५) याचे घर आहे. गुरुवारी पहाटे दोघे संशयित ज्वेलर्सच्या शटरच्या कुलूपाची पट्टी कापत हाेते. त्यांची एक पट्टी कापून झाली होती. दुसरी पट्टी कापत असताना त्याचा आवाज येऊ लागला. या दुकानासमोर राहात असलेला विशाल बावणे याला आवाजामुळे जाग आली. त्याने बाहेर येऊन पाहिले असता दोघे तरुण ज्वेलर्सचे कुलूप तोडत असल्याचे दिसले. त्याने तत्काळ पहाटे तीनच्या सुमारास ऋषिकेश याला फोन केला. ऋषिकेश झोपेतून उठून खाली आला. त्यावेळी अल्पवयीन मुलाच्या हातात कुकरीसारखे धारदार शस्त्र होते.ऋषिकेशने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने ऋषिकेशच्या कानावर, गालावर, तसेच मानेवर डाव्या बाजूने वार केले. तसेच संशयितांपैकी दुसरा आरोपी विशाल बावणे याला मारण्यासाठी हातात पोपट पाना घेऊन धावला. याचवेळी इतर नागरिकही आवाजाने तेथे आले. 

नागरिकांनी दोघा संशयितांना काठीने अक्षरश: बदडून काढले. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. जखमी ऋषिकेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघेही पहिल्यांदाच रेकाॅर्डवरनागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या संशयित आरोपींकडे पोलिस कसून चाैकशी करत आहेत. दोघेही पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकाॅर्डवर आले आहेत. त्यामुळे या दोघा संशयितांनी सातारा शहरात आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याची कसून चाैकशी पोलिसांकडून केली जात आहे.