राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST2021-04-20T04:40:47+5:302021-04-20T04:40:47+5:30

सातारा : सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या वतीने राष्ट्रवादी भवन सातारा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

Youth's response to NCP's blood donation camp | राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद

राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद

सातारा : सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या वतीने राष्ट्रवादी भवन सातारा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना काळात रक्ताचा कमी पडणारा पुरवठा बघता रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवकच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित केलेली आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी भवन येथे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात भासणारा रक्ताचा तुटवडा बघता युवकांच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी स्वतः उपस्थित राहून केले. रक्तदान शिबिरासाठी युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवकचे प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, सरचिटणीस राजकुमार पाटील,कर सल्लागार विभाग राज्यप्रमुख नागेश साळुंखे, सातारा युवक तालुकाध्यक्ष मंगेश ढाणे यांच्या माध्यमातून सातारा सिव्हिल हॉस्पिटलची ब्लड बँक उपस्थित होती. यावेळी एकूण १०२ बाटल्या रक्त संघटन करण्यात आले.

कार्यक्रमास महिला प्रदेश सरचिटणीस समीद्रा जाधव, नलिनी जाधव, युवती अध्यक्ष पूजा काळे,स्मिता देशमुख, अतुल शिंदे, तुषार गुरव,सोशल मीडिया सेलचे सचिन कुराडे, प्रथमेश पवार, सागर पवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : सातारा येथील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे व इतरांची उपस्थिती होती.

Web Title: Youth's response to NCP's blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.