मोबाईल चोरीच्या संशयावरून युवकाचा खून
By Admin | Updated: July 14, 2016 00:06 IST2016-07-14T00:06:30+5:302016-07-14T00:06:30+5:30
गोंदवले बुद्रुक येथील घटना

मोबाईल चोरीच्या संशयावरून युवकाचा खून
दहिवडी : माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील झळकेवस्ती येथे मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकाचा खून करण्यात आला. शकील गागडे (वय २५, रा. दहिवडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
शकील गागडे आणि त्याची भावजय झळकेवस्तीवर धान्य मागण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरात वृद्धा होती. त्या आजीने धान्य देण्यास त्यांना नकार दिला. त्यानंतर आजी तेथून निघून गेली. परत आल्यानंतर घरात मोबाईल नसल्याचे त्यांना समजले.
‘या दोघांनीच मोबाईल चोरला असावा,’ असा संशय घेऊन त्यांनी इतर लोकांना बोलविले. त्या लोकांनी शकील गागडेला बेदम मारहाण केली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शकीलला सहाजणांनी मारहाण केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे निष्पन्न झाली नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.