विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 28, 2014 23:24 IST2014-07-28T22:53:20+5:302014-07-28T23:24:13+5:30

उंब्रजचे ग्रामस्थ संतप्त : वितरण अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप करत मृतदेह कार्यालयासमोर

Youth's death by electric shocks | विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

उंब्रज : येथील प्रवीण प्रल्हाद शिंदे या युवकाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेला वीजवितरण कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह थेट वीजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोर नेऊन ठेवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी मागणी मान्य केल्यानंतर तब्बल चार तासांनंतर मृतदेह ग्रामस्थांंनी ताब्यात घेतला.
प्रवीण हा कृष्णानगर येथे राहात होता. आज (सोमवारी) सकाळी तो इमारतीच्या टेरेसवर गेला होता. (पान ४ वर)

Web Title: Youth's death by electric shocks