शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंतप्रधान इंटर्नशिप योजना: युवकांना मिळणार दरमहा ५ हजार अन् एकरकमी ६ हजार, अर्ज प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:45 IST

PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यातील ...

PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असून, दरमहा पाच हजार आणि इंटर्नशीप पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात जास्तीत जास्त युवकांना संधी मिळण्यासाठी सातारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र प्रयत्नशील आहे.कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४च्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, हा आहे. या योजनेंतर्गत तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.

अर्ज कसा करायचा ?योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाइटवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च आहे.१२ महिन्यांची इंटर्नशिप

  • योजनेंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. सोबतच त्यांना दरमहा ५ हजार रुपयेही मिळतील. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ६ हजार एकरकमी अनुदान दिले जाईल. योजनेच्या पायलट प्रोजेक्टवर अंदाजे ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे.
  • पहिल्या फेरीसाठी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. या पथदर्शी टप्प्याची पहिली फेरी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झाली होती. या कालावधीत देशातील एकूण सहा लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केले होते.

या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. याव्यतिरिक्त कंपनी इंटर्नला अतिरिक्त अपघात विमा संरक्षणदेखील प्रदान करते. उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ पोर्टलवर नोंदणी करावी. - सुनील पवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCentral Governmentकेंद्र सरकारStudentविद्यार्थीNarendra Modiनरेंद्र मोदी