शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा वितरित करणाऱ्या युवकास कऱ्हाडात पकडले ; वाहतूक शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:07 IST

कऱ्हाड : बंदी असतानाही गुटख्याची तस्करी करून कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात त्याचे वितरण करणाºया संशयितास वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.शहरातील कोल्हापूर नाका येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.सूरज शिवाजी नलवडे (रा. गोळेश्वर, ता. कऱ्हाड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ...

ठळक मुद्देमलकापूरसह आसपासच्या गावांत विक्री

कऱ्हाड : बंदी असतानाही गुटख्याची तस्करी करून कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात त्याचे वितरण करणाºया संशयितास वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

शहरातील कोल्हापूर नाका येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.सूरज शिवाजी नलवडे (रा. गोळेश्वर, ता. कऱ्हाड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडसह मलकापूर परिसरात गुरुवारी सकाळी एक युवक दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. गायकवाड यांनी त्या युवकाच्या दुचाकीचा क्रमांक सर्व वाहतूक पोलिसांना पाठवून त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हवालदार एस. एम. सावंत, पोलीस नाईक चव्हाण हे कोल्हापूर नाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना त्यांना संशयास्पदरीत्या एक युवक दुचाकीवरून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

हवालदार सावंत यांनी युवकाकडील सॅक तपासली असता त्याच्यामध्ये गुटख्याचे पुडे असल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तो कºहाड परिसरात बेकायदा गुटख्याचे वितरण करत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले असून, याबाबतचा अहवाल अन्न सुरक्षा अधिकाºयांना कळवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसात संबंधित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी