गावाला पाणी पुरविण्याची तरुणाने उचलली जबाबदारी

By Admin | Updated: April 11, 2016 00:50 IST2016-04-10T22:22:13+5:302016-04-11T00:50:29+5:30

स्वखर्चातून टँकर : शासनाच्या मदतीपेक्षा जाणली ग्रामस्थांची तहान--दुष्काळातला आधुनिक हरिश्चंद्र--मु. पो. पिंप्रद

Youth took responsibility for providing water to the village | गावाला पाणी पुरविण्याची तरुणाने उचलली जबाबदारी

गावाला पाणी पुरविण्याची तरुणाने उचलली जबाबदारी

वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. पाणीटंचाईमुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. अशा स्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता पिंप्रद, ता. फलटण येथील एका तरुणाने गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी उचलली आहे.फलटण तालुक्यातील पिंप्रद गावात सध्या पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल सुरू आहेत. शासनाने टँकर सुरू करावा, यासाठी मागणी केली आहे. मात्र, शासनाचा टँकर अद्याप सुरू झालेला नाही. दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यापासून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी पिंप्रद सोसायटीचे संचालक किरण शिंदे-पाटील यांनी स्वखर्चातून गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला आहे. रोज सुमारे ५५ हजार लिटर पाणी टँकरने पुरविले जात आहे. (वार्ताहर)


गावात तीव्र पाणीटंचाई असून ग्रामस्थांना पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाकडून पाण्याचा टँकर मिळो अथवा न मिळो, मी आमच्या कुटुंबाच्या वतीने गावाला टँकरने पाणीपुरवठा करणार आहे.
- किरण शिंदे-पाटील

Web Title: Youth took responsibility for providing water to the village