शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हाय ना खुश असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:12 IST

हाय ना खुश असा इन्स्टाग्रामला स्टेट्स ठेवून एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यातील शनिवार पेठेत घडली.

ठळक मुद्देहाय ना खुश असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्यागळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास

सातारा : हाय ना खुश असा इन्स्टाग्रामला स्टेट्स ठेवून एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यातील शनिवार पेठेत घडली.कन्व गजानन घाडगे (वय १७, रा. न्यू इग्लिश स्कूल परिसर, सोन्या मारूती मंदिरजवळ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कन्व याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्याचे आई-वडिल मुंबईला नातेवाईकांकडे गेले होते.

घरी कन्व आणि त्याची बहीण दोघेच होते. त्यांचा मामा साताऱ्यातच राहात आहे. या मामाकडे गुरुवारी रात्री बहीण भाऊ जेवणासाठी गेले होते. मात्र, बहीण मामाकडेच मुक्काला थांबली तर कन्व हा एकटाच घरी आला. सकाळी नाष्टा करण्यासाठी येतो, असे त्याने मामाला सांगितले होते. त्यामुळे मामाने त्याच्या मोबाईलवर बराच वेळ फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही.

मामाने घरी जाऊन पाहिले असता कन्वने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी त्याच्या आत्महत्येनंतर इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो पाहिले. यावेळी त्याने हाय ना खुश असा स्टेट्स ठेवला असल्याचे पाहायला मिळाले. हा स्टेट्स त्याने कोणासाठी लिहिला, हे मात्र अद्याप समोर आले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर