युवकांनी वाहन कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : चंद्रकांत काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:25+5:302021-02-05T09:17:25+5:30
वाई : ‘दि वाई अर्बन बँकेने व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करणेसाठी दुचाकी व वैयक्तिक वापराची चारचाकी गाडी ...

युवकांनी वाहन कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : चंद्रकांत काळे
वाई : ‘दि वाई अर्बन बँकेने व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करणेसाठी दुचाकी व वैयक्तिक वापराची चारचाकी गाडी खरेदीसाठी ९.५० टक्के इतक्या कमी व्याजदराची कर्ज योजना सुरू ठेवली आहे. व्यवसायासाठी वाहन खरेदी केल्यास ११.५० टक्के इतका व्याजदर आहे. युवकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी बँकेच्या व्यावसायिक वाहन कर्ज योजनेचा लाभ घ्यावा व विविध व्यवसाय उभे करावेत आणि आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आपले योगदान द्यावे,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले.
बँकेच्यावतीने फुलेनगर येथील किशोर जमदाडे यांना टिपरसाठी (डंपर) कर्ज वितरण करताना ते बोलत होते. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक प्रतापराव शिंदे, डाॅ. शेखर कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, शाखा समिती सदस्य अविनाश गाढवे, पत्रकार विश्वास पवार, उपसरव्यवस्थापक संतोष बागुल, सहायक सरव्यवस्थापक सुहास पानसे व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जमदाडे यांना नवीन वाहनांच्या चाव्या उपाध्यक्ष चावलानी यांच्या हस्ते देण्यात आल्या. सीए. काळे व मान्यवरांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी जमदाडे यांच्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या. (वा.प्र.)
०३अर्बन बँक
फोटो ओळी – किशोर जमदाडे यांना वाहनाच्या चाव्या देताना बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, शेजारी बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, संचालक प्रतापराव शिंदे, डॉ. शेखर कांबळे व मान्यवर उपस्थित होते.