कुंडलच्या युवकाला मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST2021-02-12T04:37:17+5:302021-02-12T04:37:17+5:30

सातारा: येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असलेल्या एका शोरूमध्ये वाहनाची बॅटरी बदलून आणण्यासाठी गेलेल्या कुंडलच्या युवकाला मारहाण करून लुटल्याची घटना ...

The youth of Kundal was beaten and robbed | कुंडलच्या युवकाला मारहाण करून लुटले

कुंडलच्या युवकाला मारहाण करून लुटले

सातारा: येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असलेल्या एका शोरूमध्ये वाहनाची बॅटरी बदलून आणण्यासाठी गेलेल्या कुंडलच्या युवकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रम जाधव, राजेश जाधव, प्रशांत जाधव, हेमंतकुमार देसाई, विकास मोहिते, रोहन शिंदे यांच्यासह दहा ते पंधराजण (रा. महागाव, ता. सातारा) अशी मारहाण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनजितसिंह लाड (वय २७) व त्यांचा भाऊ सुरजितससिंह (रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) हे बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असलेल्या विश्‍व मोटर्स या दुकानात त्यांच्या वाहनाची बिघडलेली बॅटरी बदलून घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना बॅटरी आणि गाडी बदलून मिळणार नाही, असे सांगितले. यावरून मनजितसिंह व संशयितांच्यात वाद सुरू झाला. त्या वादाच्या रागातून संशयितांनी त्यांना लाथा बुक्‍यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विश्‍व मोटर्स या दुकानाचे शटर खाली करून ‘यांना आता जिवंत सोडायचे नाही',असे म्हणून सुरजितसिंह यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत सुरजितसिंह यांचे २२ हजार रूपये व एटीएम कार्ड असलेले पाकीट संशयितांनी चोरून नेले. या घटनेनंतर दोघे भाऊ आपला जीव वाचवून तेथून पळून आले. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: The youth of Kundal was beaten and robbed