दोन अपघातांत युवक ठार; एक गंभीर

By Admin | Updated: November 9, 2016 00:37 IST2016-11-09T00:37:12+5:302016-11-09T00:37:12+5:30

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर

Youth killed in two accidents; A serious | दोन अपघातांत युवक ठार; एक गंभीर

दोन अपघातांत युवक ठार; एक गंभीर

 
मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. या दोन्ही अपघातांची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.
विकास दामोदर गजगे (वय २६, रा. इचलकरंजी) असे वाठारनजीकच्या अपघातातील मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून साताऱ्याच्या दिशेने निघालेला मालट्रक (एमएच ११ एसी २६५९) कऱ्हाडनजीकच्या वाठार गावच्या हद्दीत पोहोचला असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराचा ताबा सुटून दुचाकी (एमएच ०९ टीव्ही २७६५) ट्रकवर आदळली. यामध्ये दुचाकीवरील विकास गजगे हा गंभीर जखमी झाला. महामार्ग पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी युवकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, महामार्गावर पाचवड फाटा येथे दुचाकीला (एमएच १० एटी १३०४) अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे प्रशांत हणमंत पाटील (वय ३०, रा. इस्लामपूर) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Youth killed in two accidents; A serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.