नांदोशीजवळील अपघातात युवक ठार

By Admin | Updated: January 11, 2015 00:30 IST2015-01-11T00:29:48+5:302015-01-11T00:30:06+5:30

खटाव तालुका : टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक

Youth killed in a road accident near Nandoshi | नांदोशीजवळील अपघातात युवक ठार

नांदोशीजवळील अपघातात युवक ठार

औंध : औंध ते घाटमाथा रस्त्यावरील नांदोशी गावानजीकच्या धोकादायक पुलावरील वळण रस्त्यावर टेम्पो व दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, घाटामाथ्याकडून येणारा माल वाहतूक करणारा टेम्पो (एमएच १२ जीटी ९८३९) व औंधकडून घाटामाथ्याकडे निघालेली दुचाकी (एमएच ११ बीटी ७७६९) यांच्यामध्ये नांदोशी पुलाजवळील वळणावर जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार सागर विलास साळुंखे (वय २५, मूळ रा. महाबळेश्वर, सध्या. न्हावी बुद्रुक, ता. कोरेगाव) हा जागीच ठार झाला. दोन्ही वाहनांची धडक एवढी भीषण होती की यामध्ये दुचाकीच्या पुढच्या चाकाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. पुढच्या चाकाचे तुकडे झाले आहेत. दुचाकी टेम्पोला धडकून सुमारे १० ते १२ फुटांवर जाऊन पडली. या अपघाताची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, दहा दिवसांपूर्वीच सागरचे कुटुंब महाबळेश्वर येथून न्हावी बुद्रुक येथे राहण्यास आले होते. (वार्ताहर)

Web Title: Youth killed in a road accident near Nandoshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.