शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचारप्रकरणी युवकाला सात वर्षे शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:10 IST

शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सदाशिव बसाप्पा ढाले (वय ३२, रा. हडगलीतांडा, ता. विजापूर) याला पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. जे. खान यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्दे त्याच दिवशी रात्री त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

सातारा : शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सदाशिव बसाप्पा ढाले (वय ३२, रा. हडगलीतांडा, ता. विजापूर) याला पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. जे. खान यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, सातारा शहरातील एका व्यावसायिकाकडे सदाशिव ढाले हा जेसीबी चालक म्हणून काम करत होता.

संबंधित व्यावसायिकाच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी १४ एप्रिल २०१७ रोजी खासगी क्लासला गेली होती. त्यावेळी ढाले हा तिच्या क्लासवर गेला. ‘तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी आत्महत्या करेन. तसेच तुझ्या आई-वडिलांची बदनामी करेन,’ अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्या मुलीला त्याच्या हडगलीतांडा, ता. विजापूर या गावी जबरदस्तीने घेऊन गेला. त्याच दिवशी रात्री त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावेळी जेसीबीचा चालकही गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सातारा शहर पोलिसांचे एक पथक विजापूरला रवाना झाले. हे पथक आणि विजापूरच्या पोलिसांनी हडगलीतांडा येथून दि. १६ एप्रिल २०१७ रोजी रात्री एक वाजता मुलीला व ढालेला ताब्यात घेतले. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बाललैंगिक अत्याचार कलमातर्गंत सदाशिव ढालेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जाधव यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्रा' मानून न्यायालयाने सदाशिव ढाले याला सात वर्षे सक्तमजुरी तसेच २ हजार रुपये दंड व दंड न दिल्यास साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उर्मिला फडतरे, अ‍ॅड. मंजूषा तळवळकर यांनी काम पहिले.सदाशिव ढालेसातारा येथे बुधवारी न्यायालयाने आरोपी सदाशिव ढाले याला अत्याचार प्रकरणात शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याला पोलिसांनी कारागृहात नेले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsexual harassmentलैंगिक छळCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी