शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

युवकहो देशाचं भविष्य तुमच्या हाती; विचार करून मतदान करा : अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:18 IST

केंद्र सरकारकडून राज्य सरकार मदत आणू शकले नाही, याचं दुर्दैव वाटतं. आगामी निवडणुकीत पूरग्रस्तांसाठी केलेली सरकारची तुटपुंजी मदत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या मदतीचा जनतेने विचार करावा. जनतेत सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळेच युवकांनी भविष्यात कोणाला मतदान करायचे, याचा विचार करावा, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयुवक हो देशाचं भविष्य तुमच्या हाती; विचार करून मतदान करा :अमोल कोल्हेकऱ्हाडात महाविद्यालयीन युवकांशी संवाद

कऱ्हाड  : केंद्र सरकारकडून राज्य सरकार मदत आणू शकले नाही, याचं दुर्दैव वाटतं. आगामी निवडणुकीत पूरग्रस्तांसाठी केलेली सरकारची तुटपुंजी मदत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या मदतीचा जनतेने विचार करावा. जनतेत सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळेच युवकांनी भविष्यात कोणाला मतदान करायचे, याचा विचार करावा, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी कऱ्हाड  येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी कऱ्हाड येथील विद्यानगरमधील वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहराध्यक्ष नंदकुमार पटाने उपस्थित होते.अमोल कोल्हे म्हणाले, राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान मी महाविद्यालयीन युवकांची मुद्दाम संवाद साधत आहे. युवक हे देशाचे भविष्य आहे. सातारा जिल्ह्यातील युवकांना राजकारणाची जाण आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर सध्याची राजकीय परिस्थिती, देशात आलेली मंदीची लाट आणि त्यामुळे निर्माण झालेला बेकारीचा प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. युवकांना सगळ्याची जाणीव झाली तर ते नक्कीच बदल घडवून आणू शकतात.यावेळी युवकांनी काही प्रश्न विचारले. कोल्हे म्हणाले, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी अहोरात्र लढले. जगले, स्वराज्य उभे केले, त्याप्रमाणे आजच्या युवकांनी उद्याचे भविष्य घडविण्यासाठी विचार करून योग्यप्रकारे मतदान केले पाहिजे.कोल्हे म्हणाले, चंद्रकोर काढल्याने कोणी शिवाजी अथवा संभाजी होत नाही. त्यांचे विचार ही आत्मसात करावे लागतात. आजच्या युवकांनी रस्त्यावर चंद्रकोर काढून फिरण्यापेक्षा आया बहिणी संरक्षणासाठी पुढे यावे. पूरस्थितीवरील प्रश्नावर उत्तर देताना कोल्हे म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारकडे मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र दुर्दैवाने या सरकारला केंद्र सरकारकडून मदत मिळवता आलेली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानातून हवाई पाहणी करतात. तर दुसरीकडे या पूरग्रस्त बांधवांसाठी रस्त्यावरून समाजबांधव गाड्या-गाड्या भरून जीवनावश्यक वस्तू घेऊन जातात. समाजातून पूरग्रस्तांना होत असलेली मदत पाहता शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा जनता करत नाही. शिरूर मतदारसंघातून इतक्या क्षमतेने पूरग्रस्तांसाठी मदत देण्यात आलेली आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे शेवटी कोल्हे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण