शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: मध्यरात्री विविध ठिकाणी नेत बेदम मारहाण केली, शिरवळ येथील तरुणाचा मृत्यू; अपघात दाखविण्याचा केला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:05 IST

ग्रामस्थांनी आज, सोमवारी शिरवळ बंदची हाक दिली

शिरवळ : शिरवळ येथील तरुणाला शनिवार, दि. २७ रोजी मध्यरात्री पळशीसह विविध ठिकाणी नेत बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी करीत अपघात दाखविण्याचा बनाव केला होता. दरम्यान जखमी तरुणाचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतिश अशोक राऊत (वय २३, रा. जुनी माळआळी, शिरवळ ता. खंडाळा) असे मृताचे नाव आहे.याप्रकरणी तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, इतरांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेसह शिरवळ पोलिसांची तपास पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याकरिता शिरवळ ग्रामस्थांनी सोमवार, दि. २९ रोजी शिरवळ बंदची हाक दिली आहे.शिरवळ येथील अशोक दिनकर राऊत हे शिरवळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा आतिश हा कवठे येथील एका कंपनीमध्ये कार्यरत होता. शनिवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान पळशी येथील नातेवाइकांनी दूरध्वनीद्वारे अशोक राऊत यांना कळविले की, पळशीतील युवकांनी आतिशला मारहाण केली आहे. तुम्ही लवकर पळशीला या.’ मात्र अशोक राऊत यांनी नातेवाइकांना आतिशला शिरवळच्या रुग्णालयात पाठविण्याची विनंती केली.अशोक राऊत हे मध्यरात्री अडीचच्या दरम्यान शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता गंभीर जखमी आतिशचे कपडे फाटलेले, डोळ्याखाली, तोंडाला, डोक्याला व मार लागल्याचे दिसत होते. रक्त येत होते. यावेळी वडील अशोक राऊत यांना आतिश याने पळशी येथील युवकांनी मारहाण केल्याचे सांगत तो बेशुद्ध झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आतिशची तपासणी करत पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथून पुण्याला पाठविण्यात आले. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आतिशचा मृत्यू झाला.दरम्यान, घटनास्थळी फलटण पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, शिरवळचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली. सातारा येथील फॉरेन्सिक विभागाकडून घटनास्थळाची तपासणी केली आहे. अशोक राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत अज्ञात कारणावरुन तेजस भरगुडे, भाऊ दीपक भरगुडे व इतरांनी आतिश याला मारहाण केल्याचे म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के तपास करीत आहेत.आई देवदर्शनासाठी परराज्यातआतिश राऊतचा पळशी येथील युवकांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर याबाबतची कल्पना देवदर्शनासाठी परराज्यात गेलेल्या आईला देण्यात आली नाही. लवकर येण्यास सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Youth Dies After Beating; Murder Disguised as Accident

Web Summary : A young man from Shirwal, Satara, died after being brutally beaten. The perpetrators tried to disguise the murder as an accident. Police have arrested two individuals and are investigating thirteen suspects. Villagers have called for a Shirwal bandh demanding immediate arrests.