शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाच्या खड्ड्यात युवक दुचाकीसह कोसळला, गंभीर जखमी; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:29 IST

युवकाला बोलता येत नसल्यामुळे त्याच्यावर घडलेला प्रसंग त्याला नीट सांगताही येत नव्हता

सातारा : सातारा शहरातील गुरुवार परजावर बांधकामासाठी पाया खोदला आहे. या ठिकाणी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास युवक दुचाकीसह कोसळून जखमी झाला. हा युवक मूकबधिर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवार परज येथे शासकीय व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी पायाचे खोदकाम करण्यात आलेले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी चारही बाजूने पत्र्याचे कुंपण केले आहे. परंतु दक्षिणेकडील बाजूला पत्रा व्यवस्थितरीत्या लावला गेला नाही. रस्ता आणि कुंपण यामध्ये तीन-चार फुटांचे मोठे भगदाड आहे. रस्त्याच्या कडेने ये-जा करणाऱ्यांना या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री खैरमोडे (पूर्ण नाव समजले नाही) हा युवक पत्र्याच्या कुंपणाशेजारून जात होता. त्यावेळी रात्री अंधार असल्यामुळे कुंपणाखाली असलेल्या धोक्याचा अंदाज न आल्याने तो दुचाकीसह खड्ड्यात कोसळला. युवक मूकबधिर असल्याने त्याने कसाबसा आरडा-ओरडा केला. त्यावेळी परज परिसरातील युवक तातडीने मदतीसाठी धावले. सर्वांनी मिळून युवकाला कसेबसे खड्ड्यातून बाहेर काढले. या घटनेनंतर संबंधित युवकांची जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावाधाव सुरू होती.

लोखंडी सळ्यांमुळे धोका..परजावर बांधकामाचा पाया खोदला असून, पिलरच्या उभ्या सळ्या धोकादायक आहेत. या ठिकाणी युवक रस्त्याच्या कडेलाच कोसळला; मात्र सळ्यांपासून बचावला. त्यास किरकोळ दुखापत झाली आहे. या युवकाला बोलता येत नसल्यामुळे त्याच्यावर घडलेला प्रसंग त्याला नीट सांगताही येत नव्हता. भेदरलेल्या या जमखीला स्थानिक युवकांनी सावरले व रुग्णालयात दाखल केले. त्याची दुचाकी तशीच घटनास्थळीच पडलेली होती.