दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:20+5:302021-02-06T05:16:20+5:30
वाई : वाई तालुक्यातील एकसर हद्दीत दुचाकीवरून ओढ्यात पडून युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला. भाऊ ...

दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू
वाई : वाई तालुक्यातील एकसर हद्दीत दुचाकीवरून ओढ्यात पडून युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला.
भाऊ महेंद्र भोसले (वय ३५, धावली ता. वाई) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ महेंद्र भोसले हा दररोज सकाळी धावलीवरून वाईला यायचा आणि सायंकाळी वाईवरून धावलीला जायचा. गुरुवारी सायंकाळी काम संपल्यानंतर तो गावी परत जात असताना एकसर गावच्या हद्दीत ओढ्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यानंतर तसाच ओढ्यात पडून जखमी अवस्थेत होता. सकाळी ही बाब निदर्शनास आली, तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वाई पोलीस ठाण्यात मिळाली. रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीचा अपघात झाला. याची माहिती विजय श्रीरंग भोसले यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.