एसटी-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST2021-03-16T04:39:54+5:302021-03-16T04:39:54+5:30

सूरज चंद्रकांत भिलारे (वय २७, रा. भिलार, ता. महाबळेश्वर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी ...

Youth dies in ST-bike collision | एसटी-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

एसटी-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

सूरज चंद्रकांत भिलारे (वय २७, रा. भिलार, ता. महाबळेश्वर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, सूरज भिलारे हा दुचाकी (एमएच ०२ डीसी ७११०) वरुन भिलारहून माणगावला मित्राच्या लग्नासाठी निघाला होता. तो आंबेनळी घाटातील चिरे खिंड हद्दीत आला असता, महाड-अक्कलकोट एसटी (एमएच २० ३०६९) ही जात असताना एसटीची मागील बाजू मोटारसायकलला लागल्यामुळे दुचाकीस्वार खाली पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला पोलीस व स्थानिकांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस हवालदार आशिष नटे व सहकारी यांनी घटनास्थळी धावून गेले. अपघाताची पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आशिष नटे हे तपास करीत आहेत.

दरम्यान, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक आणि शवविच्छेदन करणारे अनुपस्थित असल्यामुळे दुपारी अडीचपर्यंत शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यामुळे नातेवाईकांना ताटकळत रहावे लागले. यावेळी नातेवाईक श्रीकांत भिलारे यांनी आरोग्य यंत्रणेला जाब विचारत आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त केला.

फोटो

१५महाबळेश्वर अॅक्सिडेंट

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटात एसटी-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. (छाया : अजित जाधव)

Web Title: Youth dies in ST-bike collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.