इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे ‘विश्वासघात आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:33+5:302021-02-18T05:14:33+5:30
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, अभिजीत चव्हाण, वैभव थोरात, दिग्विजय सूर्यवंशी, शैलेश ...

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे ‘विश्वासघात आंदोलन’
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, अभिजीत चव्हाण, वैभव थोरात, दिग्विजय सूर्यवंशी, शैलेश चव्हाण, अमित जाधव, आमिर आतार, वीरेंद्र सिंहासने, राहुल पवार, संग्राम काळभोर, श्रीकांत मुळे, शुभम लादे, विवेक चव्हाण, इंद्रजीत जाधव, जयवर्धन देशमुख, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, रोहित पाटील, शुभम लादे, विक्रम जाधव, जितेंद्र यादव, प्रकाश पिसाळ, प्रशांत यादव, राम मोहिते, अतुल थोरात, मोहसीन शेख, सुरज वेताम आदींची उपस्थित होती.
‘देशात सर्वत्र पेट्रोल, डिझेलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा गाठला आहे. तसेच गॅस सिलिंडर ८०० रुपयांच्या घरात पोहचले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. इंधनाचे वाढलेले दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे आहेत. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहेत. मात्र, केंद्रातील मोदी सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसुली करत आहे’, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केला.
इंधन दरवाढ अन्यायी आहे. ती नियंत्रित केली जावी यासाठी युवक काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी निषेध नोंदविणार असल्याचेही शिवराज मोरे यांनी यावेळी सांगितले.
फोटो : १७केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर बुधवारी युवक काँग्रेसच्या वतीने ‘विश्वासघात आंदोलन’ करून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. (छाया : अरमान मुल्ला)