गरिबीला कंटाळून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:40 IST2021-03-17T04:40:47+5:302021-03-17T04:40:47+5:30
सातारा : गरिबीला कंटाळून तालुक्यातील आसगाव येथील आकाश बापू मोझर (वय २२) या युवकाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन ...

गरिबीला कंटाळून युवकाची आत्महत्या
सातारा : गरिबीला कंटाळून तालुक्यातील आसगाव येथील आकाश बापू मोझर (वय २२) या युवकाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, दि. १५ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश मोझर हा औद्योगिक वसाहतीमध्ये मोलमजुरीचे काम करत होता. त्याचे वडीलही कामावर जातात. घरची परिस्थिती बेताचीच आहे. कधी कधी तो कामावरही जायचा नाही. त्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासायची. यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, सदाशिव नारायण मोझर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हवालदार राजेंद्र तोरडमल हे अधिक तपास करत आहेत.