गोडोली येथे युवकाला बेदम मारहाण; नऊजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:42 IST2021-01-16T04:42:44+5:302021-01-16T04:42:44+5:30

सातारा : येथील गोडोलीमधील एका युवकाला आठ ते नऊजणांनी लाथाबुक्क्यांनी तसेच दांडक्यांनी मारहाण केली. रोहन देवकुळे असे मारहाण ...

Youth beaten to death at Godoli; Crime on nine | गोडोली येथे युवकाला बेदम मारहाण; नऊजणांवर गुन्हा

गोडोली येथे युवकाला बेदम मारहाण; नऊजणांवर गुन्हा

सातारा : येथील गोडोलीमधील एका युवकाला आठ ते नऊजणांनी लाथाबुक्क्यांनी तसेच दांडक्यांनी मारहाण केली. रोहन देवकुळे असे मारहाण झालेल्याचे नाव असून, त्याने याप्रकरणी संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नऊजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रोहन रमेश देवकुळे (रा. गोडोली, सातारा) याला बुधवार, दि. १३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अभी रोकडे, सौरभ सोनवणे, राज यादव, मेहुल भागवत, कुणाल मुळे, सागर काशीद (सर्व रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, सातारा) तसेच अन्य दोन ते तीन अनोळखी मुलांनी गोडोली येथील कृष्णकुंज अपार्टमेंटजवळच अडवले आणि ‘तू आमच्या इथल्या कुठल्या तरी मुलीवर लाईन मारतोस’ असा गैरसमज करुन घेतला. ‘तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करु, तू आमच्याविरुध्द पोलिसात तक्रार दिलीस तर जिवंत राहशील का?’ अशी धमकीही दिली. यावेळी या सर्वांनी मिळून रोहन याला हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि लाडकी दांडक्याने मारहाण केली. या घटनेनंतर रोहनने या सर्वांच्याविरोधात गुरुवार, १४ रोजी रात्री आठ वाजता सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.

Web Title: Youth beaten to death at Godoli; Crime on nine