विनयभंगप्रकरणी युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:55 IST2021-01-02T04:55:47+5:302021-01-02T04:55:47+5:30
कास, ठोसेघरला पर्यटकांची रेलचेल पेट्री : नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील पर्यटकांनी कास, ठोसेघर, चाळकेवाडी, बामणोली या पर्यटनस्थळांना भेटी देऊन येथील ...

विनयभंगप्रकरणी युवकास अटक
कास, ठोसेघरला
पर्यटकांची रेलचेल
पेट्री : नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील पर्यटकांनी कास, ठोसेघर, चाळकेवाडी, बामणोली या पर्यटनस्थळांना भेटी देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. बहुतांश पर्यटकांनी बामणोलीला भेट देऊन येथील नौकाविहाराचा आनंदही लुटला. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीतदेखील पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. येथील ब्रिटिशकालीन पॉईंट, क्षेत्र महाबळेश्वर व मुख्य बाजारपेठ पर्यटकांनी गजबजून गेली होती.
सातारा शहराचा पारा १६ अंशांवर
सातारा : थंडीची लाट हळूहळू ओसरू लागली असून, सातारा शहराच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. सातारकरांना दिवसभर उन्हाचा तडाखा सहन करावा लागत असून, अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान विभागाने शुक्रवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३०.७, तर किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले. थंडी ओसरू लागल्याने नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडू लागले आहेत.