शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्याचे काळे पाणी बंद करण्यासाठी युवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 20:26 IST

ग्रामसभेत साखर कारखान्यामधून येणारे काळे पाणी गोपूज हद्दीत सोडण्यात येऊ नये, यामुळे विहिरी, कूपनलिका व अन्य जलस्त्रोत खराब होऊ लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, काळे पाणी व मळीचा प्लांट बंद करण्यात यावा, याबाबत ठराव करण्यात आला होता, तसा पत्रव्यवहार कारखान्याशी करण्यात आला

ठळक मुद्देगोपूज ग्रामसभेत ठराव : पाणीपुरवठा योजनेस फिल्टर बसवून देण्याची लेखी हमी

औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्यातून येणारे टाकाऊ काळे पाणी बंद करण्यासाठी रविवारी झालेल्या ग्रामसभेत एकमुखाने ठराव संमत करण्यात आला.

सरपंच उषा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवक सुनील राजगुरू यांनी विविध विषयांचे वाचन केले. कारखान्यातून येणारे काळे पाणी यासंदर्भात याअगोदर दि. १९ रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यावेळी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असलेले युवक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामसभेत साखर कारखान्यामधून येणारे काळे पाणी गोपूज हद्दीत सोडण्यात येऊ नये, यामुळे विहिरी, कूपनलिका व अन्य जलस्त्रोत खराब होऊ लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, काळे पाणी व मळीचा प्लांट बंद करण्यात यावा, याबाबत ठराव करण्यात आला होता, तसा पत्रव्यवहार कारखान्याशी करण्यात आला होता.

रविवार, दि. २६ रोजी झालेल्या ग्रामसभेत कारखान्याने दिलेल्या लेखी उत्तराचे वाचन करण्यात आले. यामध्ये कारखान्याने पुढील हंगामात मळी प्लांट बंद करणार असून, आताचा गाळप हंगाम पूर्ण झाल्यानंतर गावाला दिलेल्या पाणीपुरवठा योजनेस फिल्टर बसवून देण्याचे लेखी दिले आहे. काळे पाणी लगेचच बंद झाले पाहिजे, ते गावच्या हद्दीत न सोडता कारखान्याने त्याचे व्यवस्थापन स्वतंत्ररीत्या करावे, या मागणीवर युवक व ग्रामस्थ ठाम आहेत. यावेळी उपसरपंच, सदस्य, युवक, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कारखान्यातून निघणारे काळे पाणी प्रथमत: बंद करावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. कारखान्याला आमचा विरोध नाही. इटीपी पंप लवकरात लवकर बसवावा, त्यामुळे प्रदूषण होणार नाही. मात्र काळ्या पाण्याचा बंदोबस्त कारखाना प्रशासनाने तातडीने करावा, गावच्या हद्दीत हे पाणी सोडू नये.-जयदीप देशमुख, गोपूजपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी कंडेन्सट पॉलिशिंग युनिट नावाची यंत्रणा बसविण्यासाठी २०१७ मध्ये व्यवस्थापनाने निर्णय घेतला होता. गळीत हंगामात काही शेतकऱ्यांनी याच पाण्याची शेतीसाठी मागणी होती. ते पाणी आम्ही दिले, त्यामुळे कंडेन्सट पॉलिशिंग युनिटचे काम प्रलंबित पडले. आता ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून इटीपीचे पाणी इतरत्र कुठेही सोडणार नाही.-स्वरूप देशमुख,  असि. जनरल मॅनेजर, ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपूज. 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणSatara areaसातारा परिसर