सातारा : वीस वर्षीय तरुणीवर एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात संबंधित तरुणाला दोघांनी मदत केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संबंधित तीन तरुणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणीला दि. १२ रोजी दुपारच्या सुमारास संबंधित तीन युवकांनी रेड्याची जत्रा बघायला चल म्हणून घेऊन गेले. वाटेमध्ये दोघांनी त्या तरूणीला पकडून ठेवले, तर तिसऱ्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.या प्रकारानंतर संबंधित पीडित तरूणीने त्यांना ढकलून तेथून पळ काढला. घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, त्रास होऊ लागल्यानंतर तिने या प्रकाराची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मुख्य आरोपींसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे अधिक तपास करीत आहेत.
Crime News Phaltan: जत्रा बघायला म्हणून घेऊन गेले, अन् तरुणीवर केला बलात्कार; तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 16:29 IST