शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जर्मनीचे तरूण भारतभर फिरले..पैशाची चणचण भासताच गांजा शेतकरी बनले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 11:03 IST

CrimeNews Satara- पस्तीस देश फिरल्यानंतर छत्तीसवा देश फिरण्यासाठी दोघे जर्मनीहून भारतात आले. घरातून आइ पैसे देत होती. या पैशावरच हे दोघे मित्र भारतभर हिंडत होते. मात्र, पैशांची चणचण भासू लागल्यानंतर जर्मनच्या दोघा मित्रांनी शॉर्टकट मारून घरातच गाजांची शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात उघड झाले.

ठळक मुद्देजर्मनीचे तरूण भारतभर फिरले..पैशाची चणचण भासताच गांजा शेतकरी बनले! खर्चासाठी आइ देत होती पैसे; तब्बल पस्तीस देशात भ्रमंती

सातारा: पस्तीस देश फिरल्यानंतर छत्तीसवा देश फिरण्यासाठी दोघे जर्मनीहून भारतात आले. घरातून आइ पैसे देत होती. या पैशावरच हे दोघे मित्र भारतभर हिंडत होते. मात्र, पैशांची चणचण भासू लागल्यानंतर जर्मनच्या दोघा मित्रांनी शॉर्टकट मारून घरातच गाजांची शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात उघड झाले.सर्गीस व्हिक्टर मानका (वय ३४), सेबेस्टियन स्टेन मूलक (वय २५) अशी जर्मन मित्रांची नाव आहेत. या दोघांनी वाइमधील एका रो हाऊसमध्ये गांजाची शेती केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

सर्गीस मानका याची घरची आथिक परिसैथिती उत्तम आहे. तो आत्तापर्यंत तब्बल पस्तीस देश फिरला आहे. वयाच्या वीस वर्षांपासून तो पर्यटनाच्या निमित्ताने देशभर फिरत आहे. भारतात येताना मात्र, त्याचा मित्र सेबेस्टियनला तो सोबत घेऊन आला. या दोघांनी येताना केवळ तीन महिन्यांचा पर्यटन व्हिजा काढला होता. त्यानंतर ते परत जाणार होते. मात्र, गोव्यात राहात असताना त्यांनी तेथेही गांजांची शेती केली. यात त्यांना अटक झाली. दोघांचेही पासपोर्ट जप्त करण्यात आले.

या खटल्याचा निकाल पूर्ण होइपर्यंत त्यांना भारतातून जर्मनीला जाता येणार नाही. या दोघांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी गोव्यातून थेट वाइमध्ये बस्तान बसविले. एका सैथानिकाच्या मदतीने त्यांना भाड्याने रो हाऊस मिळाला. विशष म्हणजे या रो हाउसचे भाडे महिन्याला पंधरा हजार रुपये होेते.

काहीही कामधंदा न करता हे दोघे भाडे देत होते. जर्मनीहून येताना सर्गेस याने आइचे एटीएम आणले होते. या एटीएमद्वारे तो जर्मनीशी संलग्न असणाऱ्या बँकेतून तो पैसे काढत होता. मात्र, तरीही त्यांना पैशाची चणचण भासायची. यातूनच त्यांनी पुन्हा गोव्यातील गाजांच्या शेतीचा डाव वाइत आखला. जर्मनीला परत जाण्याची आशा धूसरगाजांची शेती करणे व गांजा जवळ बाळगणे हा गुन्हा असून, हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर २० वर्षे ते जन्मठेपेपर्यंत कायद्यात तरदूत आहे. या जर्मन युवकांवर अशाप्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे सिद्ध झाल्यास परत जर्मनीला जाण्याची आशा त्यांची धूसर होइल.दोघांचेही स्वभाव अत्यंत आक्रमकसर्गीस आणि सेबेस्टिनयन या दोघांचे स्वभाव अत्यंत आक्रमक आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यांना वारंवार प्रश्न केल्यानंतर दोघेही पोलिसांशी चिडून बोलत तसेच इंग्रजीमधून शिवीगाळ करत होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही ते बोट दाखवून तूला मी ठार मारेन, अशी धमकी द्यायचे. त्यांच्या शरीरात गांजाचा अंमल असल्यामुळे कदाचित त्यांची वर्तवणूक अशी, असावी.एक वर्षे सन्यदलात नोकरीसर्गीस याने जर्मनीच्या सैन्यात एक वर्षे नोकरी केली आहे. त्यानंतर त्याने ही नोकरी सोडून जगभर फिरण्याचा चंग बांधला. अत्यंत कमी वयामध्ये त्याने तब्बल ३५ देशांमध्ये पर्यटन केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस