पूर्व वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:26 PM2020-06-08T12:26:36+5:302020-06-08T12:30:03+5:30

पूर्व वैमनस्यातून करंजेमधील प्रथमेश अरूण पिसाळ (वय १८, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) या युवकावर तिघांनी कोयत्याने खूनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सांयकाळी घडला. यात प्रथमेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

The young man was stabbed in the animosity | पूर्व वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार

पूर्व वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार

Next
ठळक मुद्देपूर्व वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वारतिघांवर गुन्हा ; करंजेतील घटनेने खळबळ

सातारा : पूर्व वैमनस्यातून करंजेमधील प्रथमेश अरूण पिसाळ (वय १८, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) या युवकावर तिघांनी कोयत्याने खूनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सांयकाळी घडला. यात प्रथमेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धांत संजय किर्दत, अजिंक्य गणेश किर्दत, मयुरेश रवींद्र भोसले (सर्व रा. करंजे पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रथमेश पिसाळ हा त्याच्या मित्रांसमवेत दि. ६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कंरजे येथील मानकेश्वर मैदानात मित्रांसमवेत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी वरील संशयित तिघे दुचाकीवरून त्याठिकाणी आले. प्रथमेशला शिव्या देऊ लागले.

यावेळी प्रथमेशने शिव्या न देण्याबाबत व शिव्या देण्याचे कारण विचारले असता त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर याचे रुपांतर मारामारीत झाले. सिध्दांत याने त्याच्या कमरेला लावलेल्या कोयत्याने प्रथमेशच्या डोक्यावर वार केले. तर इतर दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत प्रथमेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सिध्दांत संजय किर्दत (वय १९) याने दिलेल्या फियार्दीवरून प्रथमेश अरूण पिसाळ, सोमनाथ दीपक पवार, शुभम पिसाळ, चिन्मय गायकवाड, नितेश पिसाळ (सर्व रा. करंजे पेठ, सातारा) यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संशयितांनी हॉकी स्टिकने मारहाण केल्याचे सिद्धांत किर्दत याने आपल्या फिर्यादित म्हटले आहे.

Web Title: The young man was stabbed in the animosity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.