मासेमारी करताना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST2021-04-27T04:41:01+5:302021-04-27T04:41:01+5:30

सातारा : तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पात्रात मासे पकडण्यासाठी ठेवलेली डालगी काढत असताना एका तरुणाचा बुडून ...

Young man drowns in river while fishing | मासेमारी करताना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

मासेमारी करताना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

सातारा : तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पात्रात मासे पकडण्यासाठी ठेवलेली डालगी काढत असताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

सुनील बाबू आटोळे (२८, रा. आप्पा पाटील नगर, कोरेगाव) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुनील आटोळे हा तरुण रविवार, दि. २५ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास क्षेत्रमाहुली येथे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पात्रात मासे पकडण्यासाठी ठेवलेली डालगी काढत होता. यावेळी त्याचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती बाबू दाजी आटोळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास सहायक फौजदार एस. वाय. भोसले हे करीत आहेत.

Web Title: Young man drowns in river while fishing