सातारा : सातारा शहरातील एका महाविद्यालयासमोर किरकोळ कारणातून तरुणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी प्रथमेश तानाजी कदम (रा. देगाव फाट्याजवळ, सातारा) याने तक्रार दिली आहे. तर बाळा, राज आणि टोपे (पूर्ण नाव आणि पत्ता नाही) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवीगाळ करून हातातील कड्याने नाक आणि ओठावर मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
साताऱ्यात एका महाविद्यालयासमोर किरकोळ कारणातून तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:07 IST