शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: पाटणकर सरकारांचं ठरलं, भाजपचं 'कमळ' हेरलं!

By प्रमोद सुकरे | Updated: June 9, 2025 11:58 IST

नव्या जिल्हाध्यक्षांच्या इनिंग मधील पहिला मोठा धमाका 

प्रमोद सुकरेकऱ्हाड: गेल्या अनेक महिन्यांपासून'तळ्यात- मळ्यात' सुरू असणाऱ्या पाटणकर सरकारांचं अखेर पक्षबदलाचं ठरलं आहे. आता 'भाजप'चं 'कमळ' त्यांनी हेरलं आहे. मंगळवार दि. १० रोजी मुंबईत युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचं 'कमळ' हातात घेणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात हा नवा राजकीय भूकंप मानला जात आहे.खरंतर पाटण तालुक्यात लोकसभा निवडणुकी पूर्वीपासून राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू होत्या. पाटण विधानसभा मतदारसंघात तशा हालचाली, घडामोडी दिसून येत होत्या. राजकीय अभ्यासक या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अलीकडच्या काही दिवसात या हालचाली खूपच गतिमान झाल्या असून मंगळवारी हा राजकीय भूकंपाचा धक्का निश्चित मानला जातोय.शरद पवारांचे निष्ठावंत पाईक म्हणून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची ओळख आहे. थोरल्या पवारांनी नेहमीच त्यांना ताकद दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पण अलीकडच्या काही वर्षात 'वाड्यावर'चा कारभार बंद होवून तो 'कारखान्या'वरून होऊ लागला आहे. त्यामुळे पाटणकर समर्थकांच्यात अस्वस्थता वाढली आहे. कार्यकर्त्यांची हीच अस्वस्थता लक्षात घेऊन पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजप प्रवेशाचा मार्ग चोखाळला आहे.

कार्यकर्त्यांची मते आजमावलीगत १५ दिवसांपूर्वी पाटणकरांनी आपल्या मावळ्यांना वाड्यावर येण्याचं आवातनं दिलं. त्यावेळी उपस्थितांसमोर मतदारसंघातील परिस्थिती आणि भविष्यातील वाटचालीसाठी आपण नेमकं काय करावं? याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशसाठी ग्रीन सिग्नल दिला होता.

नव्या जिल्हाध्यक्षांच्या इनिंग मधील पहिला मोठा धमाका कराड दक्षिणेचे विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा नुकतीच दिली आहे. ते जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पण जिल्हाध्यक्ष या नात्याने मतदारसंघाबाहेरचा हा पहिलाच मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याने तो त्यांच्या इनिंग मधला मोठा धमाका मानला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरpatan-acपाटणPoliticsराजकारणSatyajitshinh Patankarसत्यजितसिंह पाटणकरBJPभाजपा