आपणही चव्हाणांची पायताणे उचलली

By Admin | Updated: June 17, 2016 00:22 IST2016-06-16T23:59:24+5:302016-06-17T00:22:40+5:30

रणजितसिंह देशमुख यांचा टोला : आमदारांनी जुनीच चाके घेऊन पळावे

You also took Chavan's petitions | आपणही चव्हाणांची पायताणे उचलली

आपणही चव्हाणांची पायताणे उचलली

मायणी : ‘गाडीची चाके उगळून जुनी झाल्यावर फेकून देण्यात येतात. नवी चाके लावल्याशिवाय विजयश्री मिळविता येत नाही. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांनी आता विजय मिळविला असून, आता आमदारांनी जुनी चाके व हातात काठी घेऊन रस्त्यावर पळण्याशिवाय पर्याय नाही. आपणही पृथ्वीराज चव्हाण यांची पायताणे उचलत होता, हे विसरू नका,’ असा टोला शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना नाव न घेता लगावला.
निमसोड, ता. खटाव विकास सेवा सोसायटीवर रणजितसिंह देशमुख यांच्या विचारांच्या सर्व १३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे ही सोसायटी देशमुख यांच्या ताब्यात राहिली आहे. यानिवडीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब घाडगे, चंदू घाडगे, दिगंबर देशमुख, बजरंग देशमुख, महादेव घाडगे, नीलेश घार्गे, अशोक घाडगे, नामदेव घाडगे, शिवाजी देशमुख, मोहन देशमुख, अनिल भगत, परेश जाधव, अण्णासाहेब शितोळे, शरद शितोळे, धनाजी कदम आदी उपस्थित होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘माण-खटाव तालुक्यांत पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे आली आहेत. जलसंधारण आणि येरळा, माणगंगा नदी पुनरुज्जीवनाची कामे सुरू आहेत. त्यामुळे पावसाळ्यात याच कामामुळे या तालुक्यांचे चित्र पालटताना दिसून येणार आहे.
तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी संपविण्यासाठी पालकमंत्र्यांचे पायताणे उचलू नाही तर त्यांची मिरवणूक काढू. याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. यापूर्वी आपणही पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री असताना पायताणेच उचलण्याचे काम केले होते, हे आता विसरू नका,’ असा सल्लाही यावेळी देशमुख यांनी दिला.
या निवडणुकीत भीमराव घाडगे, सुभाष देशमुख, अंकुश घाडगे, अभिजित देशमुख, महादेव माने, दादासाहेब शितोळे, किसन कदम, उत्तमराव देशमुख, महादेव तामखडे, जयसिंग तावरे, तानाजी पवार, गंगूबाई देशमुख, शांताबाई देशमुख हे बिनविरोध निवडून आले आहेत. (वार्ताहर)

सोसायटी देशमुख यांच्या ताब्यात...
निमसोड सोसायटी निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामुळे सोसायटी निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. ही सोसायटी शिवसेनेचे देशमुख यांच्या गटाच्या ताब्यात गेली आहे.

Web Title: You also took Chavan's petitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.