‘योगा’नं फुलला सातारकरांचा श्वास!

By Admin | Updated: June 22, 2016 00:16 IST2016-06-21T21:54:35+5:302016-06-22T00:16:44+5:30

जागतिक योग दिवस : जिल्हाधिकारी अन् पोलिस अधीक्षकांसह हजारो कर्मचाऱ्यांची हजेरी; शाळांमधील शिबिरांमध्ये लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग

Yoga is full of breath! | ‘योगा’नं फुलला सातारकरांचा श्वास!

‘योगा’नं फुलला सातारकरांचा श्वास!

सातारा : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित शिबिरांत शेकडो अधिकारी, कर्मचारी तसेच शाळांमधून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालयाचा आयुष विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि ईशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, ‘आयुष’च्या डॉ. संजीवनी शिंदे, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, डॉ. उज्ज्वला माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे उपस्थित होते.करमणूक केंद्र पाटबंधारे विभागात श्री अंबिका योग कुटीर, ठाणे शाखा साताराच्या वतीने, पोलिस मैदान येथे आॅर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने योग प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य कार्यक्रमाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्वामी नंदका, योगेश गाडगीळ, तिलोक बोहरा, मंगेश इनामदार, सुमित हवालदार, श्रीधर एल.व्ही यांनी प्रात्यक्षिके करून प्रशिक्षण दिले. प्राणायाम, विविध योगासने यांचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्काऊट गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

जिल्हा कारागृहात बंदीजनांची योगासने
जिल्हा कारागृहात श्री अंबिका योग कुटीरचे प्रशिक्षक राजेंद्र तांबे, रवींद्र चक्के, डॉ. राजेश शिंदे, सतीश कोळवणकर यांनी बंदीजनांना प्राणायाम, योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले. प्रार्थनेने सुरुवात करून शांतीपाठाने योगाभ्यासाचा समारोप केला.
यावेळी प्रभारी कारागृह अधीक्षक एम. के. अवघडे यांनी मार्गदर्शन केले. तुरुंगाधिकारी निवृत्ती गवळी यांनी प्रास्ताविक केले.

काही तरुणांनी बागा, अजिंक्यतारा, चारभिंती, यवतेश्वरच्या डोंगरावर जाऊन योगा केला. हा क्षण त्यांनी मोबाईलवर सेल्फी काढून बंदिस्त केला. या तरुणांमध्येही कमालीचा उत्साह जाणवत होता.


योगा दिनाच्या निमित्ताने असंख्य शाळांचे मैदान सकाळीच विद्यार्थ्यांनी फुलले होते. खेळाचे कपडे घालून आलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. काही शाळांनी विद्यार्थ्यांसाठी पाणी, नाष्ट्याची सोय केली होती.

Web Title: Yoga is full of breath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.