शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

‘होयबां’ंमुळे विकासाला खीळ

By admin | Updated: January 28, 2015 00:58 IST

बाळासाहेब बाबर : अतिक्रमणांना पाठीशी घातले जाते

सातारा : विरोधी पक्षनेता अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी अतिक्रमण या मोहिमेवरून ‘धनदांडग्यांना संरक्षण आणि गोरगरीबांची पिळवणूक’ असा पालिकेचा कारभार सुरू आहे. बेकायदेशीर अतिक्रमणधारकांना पालिका पदाधिकारीच पाठीशी घालत आहेत. पालिकेत ‘होयबा’ नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने नागरिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले जात नसल्याने घनकचरा सारखे प्रकल्प आणि अतिक्रमणे काढली जात नाहीत, असा आरोप बाबर यांनी करत पालिका कारभाराचे वाभाडे काढले.पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली छ. शिवाजी सभागृहात मंगळवारी झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील २१ विकास कामांच्या विषयांपैकी २० विषयांना सभागृहात मंजूरी देण्यात आली. शहराच्या हद्दीबाहेरील उपनगरे व शाहूपुरी ग्रामपंचायतीचा कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकण्याच्या विषयास मंजूरी न देता तो विषय स्थगिती देण्यात आली. सभेला नविआ, साविआ आघाडीचे नगरसेवकांची उपस्थिती होती.शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने मोहिम हाती घेतली. अतिक्रमणे काढताना मुख्य रस्त्यांवरील धनदांडण्यांच्या इमारतीची अतिक्रमणे न हटविता गोरगरीबांची गल्लीबोळातील अतिक्रमणे काढून दिखावा केला आहे. त्याचबरोबर यापुर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिका हद्दीतील करंजे तर्फ सातारा औद्योगिक वसाहतीत पालिकेच्या अतिरीक्त जागा काहींनी बळकावून अतिक्रमण केले आहे. त्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात चौकशी समिती नेमून काढण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. अतिक्रमण विषयांवर सभागृहात केवळ चर्चा होते, कारवाई होत नाही. हे गतीमान कारभाराचे लक्षण नाही अशी टिकाही केली. रवी पवार यांनी प्रभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी पुरवठा अभियंता पंढरीनाथ साठे यांना धारेवर धरले. साठे यांची बदली झाल्याने पाणी प्रश्न ते गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे गणेश टाकीतून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यासाठी साठे यांना फोन केला तर त्यांचा फोन लागत नाही. फोन बंद केलेला असतो. यावर साठे म्हणाले, माझा फोन चालू असतो, कधीही बंद नसतो. आपण पाणी किती वेळ सोडतो याचे वेळापत्रक देण्याची व्यवस्था करू असा खुलासा साठे यांनी सभागृहात केल्यावर रवी पवार भलतेच भडकले. अशा निरूउत्तर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी सभागृहात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)घरपट्टीला व्याज आकारणीच्या विषयावर बोलताना नगरसेविका दिपाली गोडसे म्हणाल्या, ‘पालिका नागरिकांना घरपट्टी भरण्यासाठी केवळ घरपट्टी बील दिल्यानंतर तीन ते चार महिन्यांची मुदत देते. ती घरपट्टी भरण्याची अंतिम मुदत ही मार्च अखेरपर्यंत असते. मात्र देय तारखेपासून तीन महिन्यांत घरपट्टी भरली नाही तर त्यावर व्याज आकारणी केली जाते. मार्चपर्यंत अंतीम मुदत असल्याने व्याज आकारणी करू नये असा ठराव पालिकेने करावा आणि शासनाला पाठवावा,’ अशी मागणीही गोडसे यांनी केली.पवारांकडून घरचा आहेरपालिकेने शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहिम राबविली आहे. सदरबझारमध्ये सिम्बॉयसेस हॉस्पिटमध्ये पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले. अधिकाऱ्यांना माहिती समजल्यानंतर अधिकारी कारवाईसाठी गेले होते. मात्र सभागृहातील बहुचर्चित एका नगरसेवकांने त्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली, असा जाहीर आरोप रवींद्र पवार यांनी केला.