येरळवाडी उपसरपंच पतीच्या उचापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:33+5:302021-08-27T04:42:33+5:30
वडूज : येरळवाडी (ता. खटाव) येथे मासिक मीटिंगमध्ये उपसरपंचाचे पती उपस्थित राहून ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप केल्याची लेखी तक्रार पंचायत ...

येरळवाडी उपसरपंच पतीच्या उचापती
वडूज : येरळवाडी (ता. खटाव) येथे मासिक मीटिंगमध्ये उपसरपंचाचे पती उपस्थित राहून ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप केल्याची लेखी तक्रार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल झाली आहे. यामुळे येरळवाडी परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ग्रामपंचायत येरळवाडी येथील उपसरपंच मालन मोहन बागल यांचे पती मोहन सीताराम बागल हे ग्रामपंचायत मासिक सभा बुधवार, दि. २५ रोजीच्या सभेमध्ये उपसरपंच यांच्यासोबत हजर राहून ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप केला तर या सभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य व्यतिरिक्त अन्य कोणीही थांबू नये, असे अध्यक्षांनी सांगून देखील मासिक मीटिंगमध्ये मोहन बागल यांनी मोबाइलद्वारे व्हिडीओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला.
अशा आशयाची लेखी तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांना समज देण्यात यावी, अथवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८मधील ३९ (१) अन्वये चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेविका यांनी लेखी तक्रार केली आहे. तर अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
कोट...
या मीटिंगला एक ग्रामस्थ म्हणून बसलो होतो. यादरम्यान कोणत्याही प्रकारचे शूटिंग केले नाही. ही तक्रार राजकीय द्वेषापोटी केले आहे.
-मोहन बागल, ग्रामस्थ येरळवाडी